बचतगटांनी मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्र जोपासावे

By Admin | Published: August 12, 2015 11:21 PM2015-08-12T23:21:03+5:302015-08-12T23:21:03+5:30

नीतेश राणे : फोंडाघाट येथे हिरकणी लोकसाधन संस्थेचा मेळावा

Modern groups of marketing groups should be able to develop marketing techniques | बचतगटांनी मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्र जोपासावे

बचतगटांनी मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्र जोपासावे

googlenewsNext

कणकवली : बचतगटांनी आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा. सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपली उत्पादने आणि कार्य घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले.
फोंडाघाट येथे आयोजित हिरकणी लोकसाधन संस्थेच्या सहाव्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिरकणी महिला संस्थेच्या अध्यक्ष संजीव देसाई, उपाध्यक्ष सुमित्रा कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, नगरसेविका मेघा गांगण, कणकवली सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबासाहेब वर्देकर, माजी जिल्हा परिषद सभापती संदेश सावंत, पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, स्वरुपा विखाळे, श्रीया सावंत, दादा कर्ले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सचिन कांबळे, फोंडाघाट सरपंच आशा सावंत, तुळशीदास रावराणे, विभागीय अध्यक्ष राजू रावराणे, संतोष आगे्र, जयू पटेल, वाघेरी सरपंच संतोष रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, सोशल मीडियातून महिला बचतगटांनी आपल्या व्यवसायाचे मार्केटींग केले पाहिजे. या मार्केटींगचे तंत्र अवगत करून घ्या आणि लोकांना जे पदार्थ आवडतील त्याची निर्मिती करा. बाजारपेठेत चालणाऱ्या अशा ५० पदार्थांची निर्मिती करून त्यांना आकर्षक पॅकिंग करा. बाजारपेठेतील अन्य वस्तूंशी तुमच्या मालाची सहज स्पर्धा होईल.
दिवसेंदिवस बाजारात अनेक नामांकित कंपन्याची उत्पादने येत आहेत. त्या उत्पादनांची स्पर्धा महिला बचतगटांनी केली पाहिजे. महिला बचतगटांना आवश्यक त्या उद्योग-व्यवसायांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब बचतगटांनी केला पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या बँकेतून बचतगटांना आवश्यक प्रमाणात कर्ज मर्यादा वाढवून दिली जाईल, असे आश्वासनही आमदार राणे यांनी दिले. हिरकणी महिला संस्थेने निस्वार्थी वृत्तीने केलेले काम कौतुकास्पद आहे. संघटनेचा उपयोग आर्थिक उन्नतीसाठी करणे महत्त्वाचे आहे.
पंचायत समिती सभापती आस्था सर्पे म्हणाल्या, शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. अनेक महिला बचतगट कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजी लागवड अशी उत्पादने घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी सचिन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन हिरकणी गटसाधन केद्र्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे यांनी केले.
यावेळी हिरकणी महिला संस्थेच्या उपाध्यक्ष सुमित्रा कांबळे, सचिव विशाखा भोगटे, मंगला रावराणे, श्रद्धा चोरगे, भक्ती उंबळकर, भारती नारींग्रेकर, स्नेहल कुडतरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Modern groups of marketing groups should be able to develop marketing techniques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.