चिपळुणात वनदिनी रंगली निसर्गसंध्या
By Admin | Published: March 25, 2015 09:36 PM2015-03-25T21:36:11+5:302015-03-26T00:13:01+5:30
दोनशे वर्षापूर्वीच्या महावृक्षाचे महापूजन करण्यात आले
चिपळूण : जागतिक वनदिनी चिपळुणातील रामतीर्थ तलावानजीक एक काव्य संध्याकाळ रंगली. या निसर्गसंध्येला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.शाहीर मयूर मोहिते यांनी कडाडणाऱ्या ढोलकीच्या तालावरती आपल्या पहाडी आवाजात निसर्गपोवाडा सादर करून निसर्गसंध्येचा शुभारंभ केला. संकेत मोरे, श्रद्धा शिंदे, विशाखा चितळे, प्रदीप देशमुख, मेघना चितळे, सुभाष वाणी, कुमार कोवळे, सई गद्रे, रोहित गमरे, संपदा पाटील, प्रथमेश येवले, कल्पना चितळे आदी कवींनी शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेल्या रामतीर्थ तलावाजवळ जागतिक वनदिनी चिपळूणकरांनी एक संस्मरणीय संध्याकाळ अनुभवली.प्रारंभी मनिषा दामले यांनी सर्व निसर्गप्रेमींचे स्वागत केले. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत गोवंडे, चिपळूण मधील विख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. विक्रम घाणेकर, लोककलावंत पांडुरंग सोलकर, व्यवसायिक मोहन चितळे यांच्याहस्ते दोनशे वर्षापूर्वीच्या महावृक्षाचे महापूजन करण्यात आले. त्यानंतर सह्याद्री विकास समितीचे सचिव योगेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अक्षय कांबळे, अमोल पवार, जनाब सादखान, सुरेन्द्र धाडवे, किशोर पाडगावकर, जनाब बासीत केळकर, संचित पेडामकर, हृषीकेश दाते, स्वप्नील गुरव, नितिन अरमारे यांनी व्यवस्था सांभाळली होती. (प्रतिनिधी)