सिंधू रत्न योजनेतून सुमारे ५० कोटीहून अधिक निधी प्राप्त होणार; गेळे गावासाठी सहा कोटी मंजूर - मंत्री केसरकर
By अनंत खं.जाधव | Published: October 8, 2024 03:17 PM2024-10-08T15:17:28+5:302024-10-08T15:19:22+5:30
सावंतवाडी : सिंधू रत्न योजनेतून आतापर्यंत अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सुमारे ५० कोटीहून अधिक निधी या योजनेंतर्गत ...
सावंतवाडी : सिंधू रत्न योजनेतून आतापर्यंत अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सुमारे ५० कोटीहून अधिक निधी या योजनेंतर्गत प्राप्त होणार आहे. गेळे गाव आंतरराष्ट्रीय पर्यटन गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तिथे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तिलारी, तेरवण, मेढे येथे ॲम्युझमेंट पार्क साठीची निविदा प्रक्रिया निघणार आहे. त्यामुळे त्या भागात पर्यटन विकासाला गती प्राप्त होणार आहे, अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.
..त्यामुळे मला निवडणूक प्रचारासाठी राज्यात डिमांड
कुडाळ मतदारसंघातही धनुष्यबाणच चालणार आहे. माझा शांत स्वभाव आणि चांगले वक्तृत्व यामुळे मला निवडणूक प्रचारासाठी राज्यात डिमांड आहे. माझ्या मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांच्या मंडळींनी प्रचार केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी आपण उतरेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हयात काजू बोंडापासून रस बनविण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या काजू रस प्रक्रियेसाठी कृषी विद्यापीठाला अभ्यास व प्रक्रिया करण्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढणार
सिंधुरत्न योजनेतून गणेश मूर्तिकारांना कॉम्प्रेसरसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कोकणातील दशावतार कंपन्यांना वाहनांसाठी जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये सबसिडीसाठी मंजूर होतील, असेही ते म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, तसेच भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलटसुटल चर्चेला पुर्णविराम दिला.
जनता माझ्या पाठिशी
माझी राज्यात चमकदार कामगिरी आहे. मतदारसंघात सुध्दा मी कोट्यवधीचा निधी आणला. मंत्री म्हणून काम करीत असताना कोणाच्या जमिनी खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असल्याचा विश्वासही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.