उन्हाळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी जादा गाड्या
By सुधीर राणे | Published: April 12, 2023 12:31 PM2023-04-12T12:31:27+5:302023-04-12T12:40:43+5:30
सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांवर थांबे असल्याने प्रवाशांमधूनही समाधान
कणकवली : उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, विशेषतः कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर जादा साप्ताहिक रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बुधवारपासून उधना- मैंगलोर (०९०५७) गाडीने या साप्ताहिक गाड्यांचा श्रीगणेशा होत आहे. या गाड्या मे अखेरपर्यंत, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धावणार आहेत.
उधना-मेंगलोर-उधना (०९०५७/०९०५८) १२ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. तसेच एलटीटी-करमळी-एलटीटी(०१४५५/०१४५६) ही गाडी १५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे पुण्याहून दाखल होणाऱ्या व पुण्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी सोडण्यात आलेली पुणे- एर्नाकुलम-पुणे (०१०४९/०१०५०) ही गाडी १३ एप्रिल ते २६ मे या कालावधीत धावणार आहे. तिन्ही गाड्यांना सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांवर थांबे असल्याने प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.