सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 10:10 PM2017-10-09T22:10:56+5:302017-10-09T22:11:12+5:30

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

Most Gram Panchayat elections in Sindhudurg; The method of filling the online application is good - which S. Saharia | सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

Next

कुडाळ : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे असे सांगत अर्ज भरण्यासाठी आॅनलाईनची पद्धत चांगली असल्याचे मत व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ४२५ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया व सचिव शेखर चन्ने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. सोमवारी सायंकाळी एमआयडीसीच्या विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य निवडणूक सचिव चन्ने, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते.
सहारिया म्हणाले, राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत. ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून दोन्हीही पदांसाठी एकूण ६ हजार ५०० उमेदवारी अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर सरपंचपदासाठी ८३७ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ हजार ६६१ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे नियोजन व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणेमार्फत ४५ विभाग करण्यात आले असून २० ठिकाणी नाका तपासणी पथके सीसीटीव्ही यंत्रणेसहीत कार्यान्वित असणार आहेत. भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास भरारी पथके वाढविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात येणारे रस्ते, रेल्वे, समुद्र्री व हवाई मार्ग या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत १०१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये विविध ठिकाणी पकडलेल्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या अवैध दारूच्या तसेच विनापरवाना शस्त्रास्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. 

४६ सरपंच, ९२६ सदस्य बिनविरोध : सहारिया
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सरपंचांपैकी ४६ सरपंच बिनविरोध झाल्याने २७९ सरपंचपदासाठी, तर ९२६ सदस्य बिनविरोध झाल्यामुळे १ हजार ७३५ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले. जिल्ह्यात ४ लाख २ हजार मतदार असून १ हजार २९ मतदान केंद्र्रांसाठी ६१९ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त मतदान केंद्रे कणकवली तालुक्यात असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

Web Title: Most Gram Panchayat elections in Sindhudurg; The method of filling the online application is good - which S. Saharia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.