रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

By admin | Published: February 17, 2016 11:46 PM2016-02-17T23:46:14+5:302016-02-18T21:29:37+5:30

वणंदचा आराखडा शासनाकडे : अडीच कोटींची होणार कामे

Mother's development will be of the mother | रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

रमार्इंच्या ‘माहेर’चा होणार विकास

Next

शोभना कांबळे -- रत्नागिरी --दलितांचे उद्धारक आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे माहेरगाव, वणंद (ता. दापोली) च्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ५७ लाखांचा आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
दापोलीपासून वणंद गाव ३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा असलेल्या रमाबाई आंबेडकर यांचे ते माहेर यामुळे वणंद या गावाला श्रद्धास्थान मानून आंबेडकरी जनता तसेच परजिल्ह्यातून अगदी परदेशातूनही अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र, या गावाला अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे.
माई आंबेडकर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर रमाबार्इंच्या जुन्या माहेरघरानजीक त्यांचे स्मारक बांधून घेतले होते. त्यानंतर राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर यांनी या गावाला भेट दिली होती.
या गावात शिक्षण, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास
आले. त्यामुळे गिरकर यांनी ‘आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत वणंद हे गाव दत्तक घेतले
आहे. त्यांच्या दोन कोटीच्या निधीतून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहायातून आता वणंद गावचा विकास होणार आहे. (पान ८ वर)


... ही कामे होणार!
अनेक सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याने त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी २ कोटी ५७ लाखांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी आमदार गिरकर यांनी सुचविलेल्या शौचालये, अंगणवाडी इमारती, नळपाणी योजना, रमाबाई यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण, वाहनतळ, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानशेड यांचा समावेश आहे.


‘लोकमत’ने फोडली वाचा
वणंद गावच्या समस्यांबाबत सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली. मोठ्यांची छोटी गावे या सदरातून वणंद गावच्या समस्या मांडण्यात आल्या. या गावाला असंख्य लोक भेट देत असल्याने तेथे कोणत्या प्राथमिक सुविधा हव्या आहेत, पर्यटकांची अपेक्षा काय आहे, याबाबतचा उहापोह ‘लोकमत’नेच केला आहे.

Web Title: Mother's development will be of the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.