सावंतवाडीत रंगणार मोती तलाव उत्सव, ३ मे रोजी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:52 PM2019-05-02T13:52:39+5:302019-05-02T13:59:34+5:30
सावंतवाडी नगरपरिषद व वेटलॅण्ड समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान घेण्यात येणार आल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. या उत्सवाचे उद्घाटन धवडकी येथील लोहार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडून होणार आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद व वेटलॅण्ड समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान घेण्यात येणार आल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. या उत्सवाचे उद्घाटन धवडकी येथील लोहार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडून होणार आहे.
पालिकेच्या लोकमान्य सभागृहात वेट लॅण्ड समिती व नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र्र बांदेकर, आनंद नेवगी, वेट लॅण्डचे सचिन देसाई, तिलोत्तमा मांजरेकर, सायली करमळकर, शुभम पुराणिक आदी उपस्थित होते. यावेळी सचिन देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामोद्योग या व्यवसायावर आधारित उत्सव असणार आहे.
सावंतवाडीत मोती तलाव उत्सवाची बैठक पार पडली. यात नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद नेवगी, सचिन देसाई, सुरेंद्र बांदेकर, सायल करमलकर सहभागी झाले होते.
सिंधुदुर्गात ग्रामोद्योगाला पोषक वातावरण आहे. मात्र, हे उद्योग आज लोप पावत चालले आहेत. त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी उत्सवांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरूनही वेगवेगळे कारागीर बोलावण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता येथून कपड्यांवर चित्र काढणारे चित्रकार, कर्नाटक येथील हातमाग कारागीर यांचा समावेश असणार आहे.
देसाई पुढे म्हणाले, या फेस्टिव्हलचा उद्देश खरेदी-विक्रीचा नसून देवाण-घेवाणच्यादृष्टीने बघण्यात येणार आहे. या उत्सवांचे उद्घाटन ३ मे रोजी माडखोल- धवडकी येथील लोहार कुटुंबीयांकडून होणार आहे. शिवाय ३ मे रोजी मतिमंद मुलांचा आहार वेगवेगळ््या हंगामात कसा असावा, याबाबत डॉ. सुविनय दामले मार्गदर्शन करणार आहेत. ५ मे रोजी ह्यपाणी संवर्धन आणि पाऊसह्ण यावर डॉ. उमेश मुंडले मार्गदर्शन करणार आहेत.