‘देवाचा डोंगर’वर आटआट

By admin | Published: January 18, 2015 11:14 PM2015-01-18T23:14:50+5:302015-01-19T00:23:43+5:30

शासनाचे दुर्लक्ष : कच्चा रस्ता, महिलांची पायपीट चालूच

'At the Mountain of God' Ataat | ‘देवाचा डोंगर’वर आटआट

‘देवाचा डोंगर’वर आटआट

Next

श्रीकांत चाळके - खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर या गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने, येथील ग्रामस्थांना घरापासून ४ किलोमीटर अंतरावरील जामगे गावात जावे लागते. देवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या छोटयाशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने आतापासुनच ही पायपीट सुरू झाली आहे़
तुळशीपासून ४ किलोमिटर अंतरावरील ही वाडी़ रस्ता देखील कच्चा, तोही दगडधोंड्यातून जाणारा़ रामदास कदमांनीच हा रस्ता तयार केला. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणी ढुकुनही पाहिले नाही़ डोंगरदऱ्यामध्ये ही वाडी असल्याने शासनाचा पाण्याचा टँकर तेथे जात नसल्याने प्रशासनही हताश झाले आहे़
खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे २० किलोमिटर अंतरावर आहे़ या धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे़ याच गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यापैकी धनगर समाजाची एक वाडी वसली आहे़ या वाडीत या समाजाची अवघी १० घरे आहेत़ येथील २५ ग्रामस्थांना येथे कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ या वाडीत लहानसा प-या आहे़ पाणी नोव्हेंबरपर्यंत पुरते़ त्यानंतर ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडतात. वाडी डोंगरावर असल्याने त्याना तुळशी गावात खाली उतरावे लागते. हे पाणी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येतो. ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावात ४ किलोमीटरवर उतरावे लागत असल्याने पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर चालत जावून पाण्यासाठी तीन तीन खेपा माराव्या लागत आहेत़
अशातच रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवसाला पुरेल एवढे पाणी एकाच दिवशी भरावे लागत आहे़ आतापासुनच या धनगरवाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यांच्या गाई म्हैशींना पाणी पुरवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागत आहे़ हे अवघड असले तरीही कसलीही तमा न बाळगता त्यांना हे करावे लागत आहे. धनगरवाड्यामध्ये असलेल्या या पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात असून शासनाने यात लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

पाण्याचा प्रश्न प्रलंबित
खेड तालुक्यातील देवाचा डोंगर येथील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित.
ाुळशी देवाचा डोंगरला कायमच पाण्याची प्रतिक्षा.
ग्रामस्थांना करावी लागतेय ४ किलोमीटर पायपीट.
पायथ्याशी असलेल्या छोट्याशा डबक्यातील पाणी संपले.
डोंगरमाथ्यावर जाताना ग्रामस्थांना करावा लागतोय संघर्ष.
कच्चा रस्ता, डांबरीकरण नाही, टँकर जात नसल्याने प्रशासनही हताश.
नोव्हेंबरातच पाणी नाही.

Web Title: 'At the Mountain of God' Ataat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.