रा़ स्व़ संघाचे पेठमध्ये संचलन

By admin | Published: October 21, 2015 11:03 PM2015-10-21T23:03:25+5:302015-10-21T23:04:25+5:30

रा़ स्व़ संघाचे पेठमध्ये संचलन

Movement in the RSS team | रा़ स्व़ संघाचे पेठमध्ये संचलन

रा़ स्व़ संघाचे पेठमध्ये संचलन

Next


पेठ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेठ शाखेच्या वतीने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातून संचलन करण्यात आले. तसेच येथील रानदवी मंदिर परिसरात शस्त्रपूजन केले़
रा़ स्व़ संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतविभाग कार्यवाह संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत गावचे ग्रामदैवत रानदेवी मंदिरापासून स्वयंसेवकांनी संचलन सुरू केले़ अतिशय सूत्रबद्धरीत्या बलसाडरोड, बाजारगल्लीमार्गे संचलन करत कर्मचारी रानदेवी मंदिराजवळ आले. याठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले़ यावेळी नाशिक जिल्हा बौध्दिकप्रमुख चंदू चितहे, तालुका संघचालक रामदास वाघेरे, जिल्हा धर्मजागरण प्रमुख ज्ञानेश्वर पवार, तालुका कार्यवाह चंद्रशेखर काळे, सहकार्यवाह अशोक गवळी, रंगनाथ वाडकर, अमित पठाडे यांच्यासह तालुक्यातील स्वंयसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (वार्ताहर)


 

Web Title: Movement in the RSS team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.