वीज बिले माफीसाठी आंदोलन, भाजपा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:59 PM2020-09-10T18:59:21+5:302020-09-10T19:00:42+5:30
चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.
कुडाळ : चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांविरोधात व वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.
कोरोना महामारीमुळे गेले ६ महिने उद्योगधंदे बंद आहेत. वीज ग्राहकांकडे बिले थकीत असून ती वसुलीसाठी आता महामंडळाकडून तगादा लावण्यात येत आहे. वीज बिले चुकीच्या पद्धतीने आकारली आहेत. हा ग्राहकांवर अन्याय आहे, असे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कित्येक जणांचे पगार वेळेवर न झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांची वीज बिले संपूर्ण माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा पदाधिकारी राजू राऊळ, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, महेश धुरी, बंड्या सावंत, चेतन धुरी, पणदूर सरपंच दादा साईल, दीपक नारकर, राजा धुरी, राजा प्रभू, राजेश पडते, विजय कांबळी, ममता धुरी, सरोज जाधव, रेवती राणे, सरोज जाधव, सुनील बांदेकर, भाई साटम, साईप्रसाद नाईक, विनायक गवंडळकर, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, भाऊ पोतदार, प्रताप राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तत्काळ वीज बिले माफ करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.