मुुंबईरिटर्न हात राबताहेत

By admin | Published: April 19, 2015 09:27 PM2015-04-19T21:27:06+5:302015-04-20T00:01:38+5:30

अडीच एकर शेतीत बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेतला व कायमची मुंबई सोडली. मुंबईत चाकरमानी म्हणून जीवन जगण्यापेक्षा आपला गावच बरा,

Moving to the Muirimariturn | मुुंबईरिटर्न हात राबताहेत

मुुंबईरिटर्न हात राबताहेत

Next

शिवाजी गोरे - दापोली -मुुंबईत २० वर्षे राहून जीवाची मुंबई केली. परंतु वाढती महागाई व बंद पडलेले उद्योगधंदे यामुळे सर्वसामान्य माणसाचे मुुंबईत खायचे वांदे होऊ लागले आहेत. मुंबईत गेली २० वर्षे सुकोंडी येथील तरुण महेंद्र जोशी यांनी लग्नपत्रिका छपाईच्या व्यवसायात काम केले. परंतु महिन्याच्या शेवटी हातात काहीच शिल्लक राहात नसल्याने गावाकडील अडीच एकर शेतीत बटाटा लागवड करण्याचा निर्णय घेतला व कायमची मुंबई सोडली. मुंबईत चाकरमानी म्हणून जीवन जगण्यापेक्षा आपला गावच बरा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुकोंडी गावातील तरुण २० वर्षांपूर्वी मोठ्या उमेदीने मुंबईत गेला होता. इतरांना जसे मुुंबईचे आकर्षण आहे तसेच आकर्षण त्यालासुद्धा वाटत होते. परंतु शिक्षण कमी असल्यामुळे मुुंबईत जाऊन वेठबिगारी काम करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. अनेक तरुण मुंबईत मोठ्या अपेक्षेने येतात. परंतु मुंबईत गेल्यावर भ्रमनिरास होतो. महेंद्र जोशींना मुंबईत गेल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळेल, असे वाटत होते. परंतु तसं काही झालं नाही. नाईलाजाने लग्नपत्रिका छपाई कारखान्यात काम मिळाले. परंतु पगार कमी असल्यामुळे खर्चही भागत नव्हता. त्यानंतर भाड्याने जागा घेऊन लग्नपत्रिका छपाई करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला. कामासाठी माणसे मिळत नसल्याने तो व्यवसायसुद्धा बंद पडला. त्यामुळे गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. अनेक तरुणांना गावात शेती करणे कमीपणाचे वाटू लागते. येथील तरूण मुंबईत जाऊन वेठबिगारीची कामे करतात, पण गावात शेती करणार नाहीत. मात्र, महेंद्र जोशी या तरुणाने मुंंबई सोडून गावात राहण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे बटाटा शेती, कलिंगड, वांगी, टोमॅटो, भोपळा, मिरची, मटार, काकडीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे.
कोकरी कुकराज या बटाट्याच्या जातीची लागवड करुन सुकोंडीच्या कातळावर कष्टातून जिद्दीने बटाट्याची शेती केली. शेतीचा संपूर्ण खर्च वजा जाता एकरी १ लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. आपल्या कुटुंबीयांसमवेत गावात काबाडकष्ट करुन एक एकर जमिनीत १ लाख रुपये इतका नफा मिळवून गावाकडची शेतीच बरी असे दाखवून दिले आहे. बटाट्याला चांगली मागणी असल्याने पुढच्या वर्षी अधिक लागवड करण्याचा मानस जोशी यांनी व्यक्त केला आहे.
आंबा - काजू लागवडीला जोडधंदा म्हणून बटाटा शेती व भाजीपाला शेती करण्याचा आपला मानस असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.

दापोली तालुक्यातील सुकोंडीतील तरूणाने २० वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी मुंबई गाठली. मात्र, कमी शिक्षणामुळे त्याला वेठबिगारी करण्याखेरीज अन्य पर्याय उरला नव्हता. चांगली नोकरी मिळेल या इच्छेने तो तिथे धडपडत राहिला. मात्र, त्याच्या पदरी निराशा आली. अनेक वर्षे प्रतीक्षा करीत थांबणे त्याने पसंत केले.


सुकोंडीच्या या तरूणाने मुंबईतून गावाला येणे पसंत केले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना गावात शेती करणे कमीपणाचे वाटते. मात्र, ते त्यानी वाटून घेतले नाही. कोकरी कुकराज या बटाट्याच्या लागवडीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. पहिली दोन वर्षे कलिंगड, बटाटा , वांगी, टोमॅटो, भोपळा यांची शेती त्याने केली.

कातळावर आंबा लागवड होते, ती यशस्वीही होते हे अनेक लोकांनी दाखवून दिले आहे. मात्र, महेश जोशी यांनी कातळावर बटाट्याची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. बटाट्याला चांगली मागणी आहे. आंबा, काजूला जोडधंदा म्हणून कोकणातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवड करावी, असा सल्ला जोशी यांनी येथील शेतकऱ्यांना दिला.

Web Title: Moving to the Muirimariturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.