आठ वीजचोरांवर गुन्हा दाखल महावितरण कंपनी : भरारी पथकाने केली कारवाई

By admin | Published: May 19, 2014 12:34 AM2014-05-19T00:34:47+5:302014-05-19T00:34:58+5:30

रत्नागिरी : आकडे किंवा हूक टाकणे, वीजमीटरचा गैरवापर करणे, मीटरमध्ये प्रत्यक्ष छेडछाड करणे, असे गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

MSEDCL filing of FIR against eight electricians: Action by the Bharari squad | आठ वीजचोरांवर गुन्हा दाखल महावितरण कंपनी : भरारी पथकाने केली कारवाई

आठ वीजचोरांवर गुन्हा दाखल महावितरण कंपनी : भरारी पथकाने केली कारवाई

Next

 रत्नागिरी : आकडे किंवा हूक टाकणे, वीजमीटरचा गैरवापर करणे, मीटरमध्ये प्रत्यक्ष छेडछाड करणे, असे गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कोकण झोनमधील ११०० ग्राहकांना महावितरणच्या भरारी पथकाने पकडले आहे. शिवाय रत्नागिरी सर्कलमधील आठ जणांवर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणने फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीजहानी अधिक व वीज बिलाची थकबाकी जास्त त्या ठिकाणचे वर्गीकरण करून गटानुसार भारनियमन केले जाते. महावितरणकडून वीजवसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र भरारी पथकाव्दारे वीजचोर्‍या पकडण्यात येत आहेत. कोकण झोनमध्ये वीजचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेले दिसून येत आहे. आतापर्यंत वीजचोरी, वीजगळतीमध्ये मागे असलेल्या कोकण झोनमध्येही हे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे महावितरणने शोध मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. कोकण झोनमध्ये हूक टाकण्याचे १९ प्रकार उघडकीस आले आहेत. संबंधित ग्राहकांवर १ लाख ८६ हजार ४५४ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मीटरचा गैरवापर करणार्‍यांमध्ये २६१ ग्राहक आढळलेले आहेत. शिवाय त्यांच्यावर ४४ लाख २४ हजार ४९५ रूपयांचा दंड बजावण्यात आला आहे. तसेच मीटरमध्ये छेडछाड करणार्‍या ८२० ग्राहकांना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर १ कोटी ४४ लाख ५१ हजार २६१ रूपयांचा दंड बजावण्यात आला आहे. तिन्ही प्रकारातील सुमारे ७१३ ग्राहकांनी महावितरणकडे संपर्क साधून संबंधित प्रकारात तडजोड करून ३१ लाख ७३ हजार रूपये दंडापोटी जमा केले आहेत. मात्र, ७ ग्राहकांवर महावितरणने पोलीस कारवाई केली आहे. रत्नागिरी विभागातील १, तर ७ ग्राहक खेड विभागातील आहेत. खेड विभागातील सात ग्राहकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर २ लाख ७७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MSEDCL filing of FIR against eight electricians: Action by the Bharari squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.