एटीपीमुळे महावितरणला २६ कोटींचा महसूल

By admin | Published: November 9, 2015 09:03 PM2015-11-09T21:03:23+5:302015-11-09T23:41:10+5:30

सहा महिन्यातील महसूल : ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

MSEDCL revenue of Rs 26 crores due to ATP | एटीपीमुळे महावितरणला २६ कोटींचा महसूल

एटीपीमुळे महावितरणला २६ कोटींचा महसूल

Next

रत्नागिरी : ग्राहकांना सुट्टीच्या दिवशी तसेच २४ तास वीजबिल भरता यावे यासाठी महावितरणकडून कोकण परिमंडळांतर्गत सहा स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र (एटीपी) उभारण्यात आली आहेत. दिवसेंदिवस या एटीपी केंद्रांवरील ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. एप्रिल ते आॅक्टोबर अखेर १ लाख ९१ हजार ४४४ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरले असून, त्यातून कोकण परिमंडळाला २६ कोटी ८६ लाख ३६ हजार ५०८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.महावितणकडून रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथे एटीपी केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, दापोली व खेड येथील एटीपी केंद्र जूनपासून बंद आहेत. ग्राहकांचा याठिकाणी अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे ही केंद्र बंद आहेत. रत्नागिरी, चिपळूण व सिंधुदुर्ग जिल्ह््यात कणकवली, मालवण येथील एटीपी केंद्र सुरू आहेत. या चार केंद्रामध्ये रत्नागिरी केंद्रावर ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे. एप्रिलमध्ये सहा एटीपी केंद्रांवर २७ हजार १२६ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २ कोटी ७१ लाख २० हजार ७६५ रूपयांचा महसूल मिळाला. मे मध्ये ३ हजार ४०६ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्यामुळे ३ कोटी ६९ लाख ३६ हजार २१५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. जूनपासून खेड व दापोलीतील एटीपी केंद्र बंद झाले. त्यामुळे जूनमध्ये रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, मालवण या केंद्रात २३ हजार ९५८ ग्राहकांनी वीजबिल भरले. त्यातून ३ कोटी ४४ लाख ४९ हजार ४०७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलैमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी वीजबिल भरल्याने ५ कोटी ६१ लाख ५ हजार ७०० रूपये, आॅगस्टमध्ये ३० हजार २६१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४ कोटी २१ लाख २८ हजार ९१३, सप्टेंबरमध्ये ३० हजार १४५ ग्राहकांनी ४ कोटी १८ लाख ९० हजार ५७३, आॅक्टोबरमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ५ कोटी ६६ लाख १५ हजार ७०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
अल्प प्रतिसादाअभावी खेड व दापोलीतील एटीपी केंद्र बंद करण्यात आली तरी रत्नागिरीतील केंद्राला असलेला वाढता प्रतिसाद पाहून शहरातील खालच्या भागात अर्थात रहाटाघर येथे नवीन एटीपी केंद्र प्रस्तावित आहे. ग्राहकांना संबंधित एटीपी केंद्र केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.(प्रतिनिधी)


एप्रिल ते आॅक्टोबर अखेर १ लाख ९१ हजार ४४४ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरले.
महावितरणकडून रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथे एटीपी केंद्र.
दापोली व खेड येथील एटीपी केंद्र जूनपासून बंद.
ग्राहकांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे केंदे्र बंद.

एटीपी केंद्रग्राहकमहसूल
रत्नागिरी८३२०९१२४८२४३८४
चिपळूण५२०७२८७०४३१३१
खेड१५६२१६९३९७०
दापोली१६६११४७६३६२
कणकवली३२३३०२७४२३३५१
मालवण२०६१०२६१७५३१०
एकूण१,९१,४४४२६,८६,३६,५०८

Web Title: MSEDCL revenue of Rs 26 crores due to ATP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.