बहुपयोगी जांभूळ कोकणात अद्यापही दुर्लक्षितच

By admin | Published: May 24, 2015 10:02 PM2015-05-24T22:02:27+5:302015-05-25T00:39:07+5:30

नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांखेरीज जांभूळ लागवडीकडे अजूनही कोणाही शेतकऱ्यांचे लक्ष गेलेले नाही.

The multi-functional purple is still neglected in the Konkan | बहुपयोगी जांभूळ कोकणात अद्यापही दुर्लक्षितच

बहुपयोगी जांभूळ कोकणात अद्यापही दुर्लक्षितच

Next

आबलोली : आयुर्वेदामध्ये औषधी फळ म्हणून नाव कमावलेले जांभूळ हे फळ अद्याप दुर्लक्षित राहिले आहे. कोकणातही काही भाग जांभळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या फळाकडे कोकणात अद्यापही म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही.
जांभळामध्ये २.५ टक्के प्रथिने, २१.७२ टक्के खनिजे, ०.४१ टक्के चुना, ०.१७ टक्के स्फुरद, १९ टक्के टॅनिन व १८.५ टक्के तंतूमय पदार्थ असतात. जांभूळ हे फळ कफ व पित्त विकारात उत्तम औषध ठरते. अतिसारनाशक व शीत या मुख्य गुणांमुळे मलप्रवृत्ती कमी करणारे फळ म्हणून जांभळाकडे पाहिले. अतिसार, दमा, शोष, रक्तदोष व व्रण यामध्ये तसेच कृमीनाशक म्हणून जांभळाचा वापर होतो. इतर फळांपेक्षा जांभळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मधूमेह, हृदय व यकृताच्या त्रासापासून बरे होण्यासाठी जांभळाचा वापर होतो. त्वचेचा दाह कमी करणे, रक्तस्त्राव थांबवणे यासाठीही जांभूळ उपयोगी आहे. तोंडातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी जांभळाच्या सालीचा रस काढून गुळण्या करतात. असे विविध उपयोग या फळाचे आहेत. तारुण्यपिटिका आल्यास जांभळीच्या बिया पाण्यात उगाळून तो लेप चेहऱ्यावर लावल्यास त्या निघून जातात. अशा विविध प्रकारे जांभूळ हे फळ उपयुक्त आहे. मात्र, नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांखेरीज जांभूळ लागवडीकडे अजूनही कोणाही शेतकऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे अजूनही जांभूळ दुर्लक्षित आहे. (वार्ताहर)

जांभूळ या फळाचा खाण्यायोग्य भाग ५० ते ९० टक्के एवढा असतो. त्यात एकूण विद्राव्य घटक १० ते १८ टक्के व आम्लता ०.४१ ते १.२५ टक्के इतकी असते.
झाडाचे विविध उपयोग आहेत. पानांचा वापर जनावरांना चारा म्हणून केला जातो.वाळलेल्या जांभळाच्या पानांचा उपयोग विविध प्रकारचे सुगंधी तेल काढण्यासाठी होतो.
रेल्वेमार्ग तयार करताना खाली आधार म्हणून खोडाचा वापर होतो.

Web Title: The multi-functional purple is still neglected in the Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.