मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण :  सात वयोवृध्द प्रकल्पग्रस्त करणार 10 जानेवारी पासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:07 PM2018-01-01T18:07:07+5:302018-01-01T18:09:55+5:30

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी 10 जानेवारी पासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वयोवृध्द नागरिकानी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन कणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले आहे.

Mumbai Goa highway four-lane: Fasting since January 10 to seven-year-old project affected | मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण :  सात वयोवृध्द प्रकल्पग्रस्त करणार 10 जानेवारी पासून उपोषण

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण :  सात वयोवृध्द प्रकल्पग्रस्त करणार 10 जानेवारी पासून उपोषण

Next
ठळक मुद्देसात वयोवृध्द नागरिकांचा समावेशकणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदनमहामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या !

कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी 10 जानेवारी पासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वयोवृध्द नागरिकानी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन कणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली बाजारपेठेतून महामार्ग क्रमांक 66 जात आहे. आम्ही त्याचे स्वागतही केले आहे. पण शासन आमची दिशाभूल आणि फसवणूक करून आम्हाला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रशासनाने चुकीच्या निकषांवर आमच्या मिळकतींचे मूल्यांकन करून आम्हाला पूर्णतः उ्ध्वस्त करून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा डाव आखला आहे.हे आमच्या लक्षात आले तेव्हा खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी याप्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळावा यासाठी वारंवार प्रयत्न केले.

मात्र, शासनाने आता पर्यन्त आमच्या मागण्याना केराची टोपली दाखविली आहे. प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून 7 डिसेंबर 2017 रोजी कणकवली शहर पूर्णतः बंद ठेवून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण गेंड्याच्या कातडिच्या शासनास त्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही.

त्यामुळे 10 जानेवारी 2018 पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यन्त आम्ही प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणास बसणार आहोत. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासनच जबाबदार असेल. असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री , पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही दिली आहे.

वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त करणार उपोषण !

कणकवली शहरातील मधुकर ठाणेकर( वय 89 वर्षे), आनंद अंधारी(वय 85 वर्षे), सत्यवान मांजरेकर( वय 80 वर्षे), सुभाष काकडे( वय 73 वर्षे), दत्तात्रय सापळे(वय 72 वर्षे), शामसुंदर बांदेकर(वय 80 वर्षे), गंगाधर ठाणेकर(वय 87 वर्षे) हे वयोवृध्द नागरिक प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अन्याया विरोधात आमरण उपोषणास बसणार आहेत.

महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या !

प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मिळकतीचा मोबदला कवडिमोल असून बांधकाम प्रति चौ.फू. रूपये 15000 व जमिनीचा दर प्रती गुंठा 15 लाख रूपये मिळावा. कणकवली शहर हे ग्रामीण भागाप्रमाणेच असल्यामुळे गुणांक 2 करावा. भाडेकरु व्यापाऱ्याना नुकसान भरपाई मिळावी. स्टॉल धारक व भाजी व्यापाऱ्याना जागेचा पर्याय उपलब्ध करावा.

बांधकाम मूल्यांकनाचे कागदपत्र त्वरीत मिळावेत. कणकवली शहराची फेरमोजणी व फेर मूल्यांकन व्हावे. सार्वजनिक बांधकाम विभागातील चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच हे शक्य नसेल तर आम्हाला आमच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून ठार मारून आमची शासकीय जाचातून सुटका करावी,अशा विविध मागण्या प्रशासन व शासन यांच्याकडे लेखी स्वरूपात प्रकल्प ग्रस्तांनी केल्या आहेत.

Web Title: Mumbai Goa highway four-lane: Fasting since January 10 to seven-year-old project affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.