मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:37 IST2022-07-25T16:36:00+5:302022-07-25T16:37:29+5:30
कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा ...

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण
कणकवली : मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती नागेश मोरये यांनी उपोषण सुरु केले आहे. कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारी पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगावसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत. तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांना जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही.
नागेश मोरये यांच्या उपोषणाला शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पाठींबा दर्शवला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पारकर, गजानन रेवडेकर, नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेट्ये, माजी समाज कल्याण सभापती मंगेश तांबे, काँग्रेस जिल्हा चिटणीस महिंद्र सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर, शहराध्यक्ष महेश तेली, प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष दादा कुडतरकर आदी मान्यवरांनीही उपोषणस्थळी उपस्थिती दर्शवून पाठींबा दिला.