इंग्लंडच्या पर्यटकांची मुंबई-कोकण सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:47 PM2019-11-25T23:47:14+5:302019-11-25T23:48:23+5:30
देवगड : देवगड येथे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर व देवगड बीचवर पर्यटकांची वर्दळ ...
देवगड : देवगड येथे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर व देवगड बीचवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. इंग्लंड येथील परदेशी ५० पर्यटक मुंबईतून सायकलवरून प्रवास करीत सोमवारी ५व्या दिवशी देवगड येथील हॉटेल डायमंड येथे दाखल झाले आहेत. सायकलवरून प्रवास करून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संदेश देत आहेत.
देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे.
देवगड तालुक्यामध्ये अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. गेल्या पाच वर्षांत देवगडमधील पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊन देशी पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटकांचा ओढा देवगडकडे वाढू लागला आहे.
इंग्लंडमधील पर्यटक मुंबईवरून पाच दिवसांचा सायकलवरून प्रवास करीत देवगड येथे सोमवारी दाखल झाले. सायकल चालवून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश देत त्यांनी येथील पर्यटनाबरोबर मालवणी जेवणाची तोंड भरून स्तुती केली.
५० परदेशी पर्यटक या टिममध्ये असून ते मुंबई ते गोवा असा सायकलने प्रवास करीत आहेत. हे पर्यटक देवगडमध्ये दाखल झाल्यानंतर सुप्रसिद्ध हॉटेल डायमंड येथे मालवणी जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला. त्यानंतर ते मालवणमार्गे गोव्याच्या दिशेने सायकल प्रवास करीत रवाना झाले आहेत. पर्यटकांना चांगली सेवा दिल्याबद्दल डायमंड हॉटेलचे मालक गौरव पारकर यांचे पर्यटकांनी कौतुक केले.