corona virus Sindhudurg : वेंगुर्ल्यात चार दुकानदारांवर नगरपरिषदेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:57 PM2021-05-25T16:57:57+5:302021-05-25T16:59:22+5:30

corona virus Vengurla Sindhudurg : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या वेंगुर्ला शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी सूचना आहे, असे असताना गेल्या चार दिवसात वेळेनंतर दुकाने सुरू ठेवलेल्या चार दुकानदारांवर वेंगुर्ला नगरपरिषदने कारवाई केली असून त्यांच्याकडून १,८०० रुपये दंड वसूल केला आहे.

Municipal action against four shopkeepers in Vengurla | corona virus Sindhudurg : वेंगुर्ल्यात चार दुकानदारांवर नगरपरिषदेची कारवाई

corona virus Sindhudurg : वेंगुर्ल्यात चार दुकानदारांवर नगरपरिषदेची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देवेंगुर्ल्यात चार दुकानदारांवर नगरपरिषदेची कारवाई १,८०० रुपये दंड वसूल

वेंगुर्ला : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सध्या वेंगुर्ला शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी सूचना आहे, असे असताना गेल्या चार दिवसात वेळेनंतर दुकाने सुरू ठेवलेल्या चार दुकानदारांवर वेंगुर्ला नगरपरिषदने कारवाई केली असून त्यांच्याकडून १,८०० रुपये दंड वसूल केला आहे.

दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन चालू आहे. त्याअनुषंगाने बाजारपेठेत सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावेत असे आदेश आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेने याबाबत शहरात रिक्षा फिरवून जनजागृती केली होती. मात्र, तरीही अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सुरू आहे.

पिराचा दर्गा येथील दोन, दाभोली नाका येथील एक, खर्डेकर रोडवरील एक आणि भटवाडी येथील टाइल्स दुकानावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अमित कुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल तसेच स्वप्निल कोरगावकर, राहुल कांबळे, संतोष जाधव आणि पोलीस कर्मचारी या पथकाने केली.

Web Title: Municipal action against four shopkeepers in Vengurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.