पक्षीमित्र संमेलनाला पालिका सहकार्य करणार

By admin | Published: August 10, 2015 12:43 AM2015-08-10T00:43:10+5:302015-08-10T00:43:10+5:30

बबन साळगावकर : सावंतवाडी येथील नियोजन बैठकीत माहिती

The municipal corporation will cooperate with the Board meeting | पक्षीमित्र संमेलनाला पालिका सहकार्य करणार

पक्षीमित्र संमेलनाला पालिका सहकार्य करणार

Next

सावंतवाडी : राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सावंतवाडीत होत आहे. त्याला नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. इको-सेन्सिटिव्हबाबत वादविवाद होत असताना पक्षीमित्र एकत्र येऊन चर्चा करत आहेत, यात आनंद आहे. नगर पालिका उद्यानामध्ये फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी प्रयोग करत आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.
सावंतवाडीत येत्या २३ व २४ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन नियोजनावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नगराध्यक्ष साळगावकर यांनी उपस्थिती दर्शवून भव्यदिव्य पक्षीमित्र संमेलन भरविण्यासाठी नगरपालिका अनुदान व आवश्यक ते सहकार्य देईल, असे सांगताना गार्डनमधील विशिष्ट प्रकारची वनस्पती लावून फुलपाखरांना आकर्षित करण्याचा प्रयोग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांनी पक्षीमित्र संमेलनाची रुपरेषा स्पष्ट केली. तर आभार डॉ. गणेश मर्गज यांनी मानले. नगर पालिकेच्या सहकार्याची अपेक्षा आयोजकांनी केली.
या संमेलनाच्या जिल्ह्यातील पक्षांची अधिकृत सूची बनविण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यात कोणत्या भागात कोणकोणते पक्षी आहेत, त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबनिहाय करावी. यासाठी जरूर तर गुगलवर जाऊन सर्च केल्यास सूची बनविण्याची आवश्यक ती माहिती मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षांची यादी तयार करणे सोपे होईल, असे सूचविण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. धिरेंद्र होळीकर, डॉ. गणेश मर्गज, डी. के. सावंत, डॉ. दीपक तुपकर, डायमंड लोबो यांनी भाग घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षीमित्र संमेलन होत असल्याने मिनी पक्षीमित्र संमेलन घेऊन चळवळ जाणीवजागृती निर्माण करण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत, असे प्रा. सुभाष गोवेकर यांनी सांगितले.
निसर्ग मित्रमंडळाचे सदस्यत्व मोहीम राबवितानाच या संमेलनासाठी निधी गोळा करण्याचे ठरविण्यात आले. पक्षीमित्र संमेलनात सक्रीय सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासोबतच संवर्धनाचे कामही होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पक्षीमित्रांनी जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे, असे सूचविण्यात आले.
त्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी १६ आॅगस्ट रोजी डेगवे, पेडवे-माजगाव भागात पक्षीमित्रांनी निरीक्षणासाठी जायचे ठरविले. त्या दिवशी सकाळी ७ वाजता स्थापेश्वर मंदिर डेगवे येथून मोहीम सुरू होईल. शक्य झाल्यास तळकट बागेपर्यंत पक्षीमित्र जातील, असे सूचविण्यात आले. डेगवेची जबाबदारी संजय देसाई व रणजीत सावंत यांनी घेतली. तर २३ आॅगस्ट रोजी माजगाव येथे पक्षीमित्रांनी सकाळी ७ वाजता फिरायचे ठरविले. त्याची जबाबदारी डी. के. सावंत यांनी घेतली.
यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. गणेश मर्गज, प्रा. धिरेंद्र होळीकर, डी. के. सावंत, डॉ. दीपक तुपकर, संजय देसाई, रणजीत सावंत, महेंद्र पटेकर, अभिमन्यू लोंढे, मिलिंद भोसले, जगदीश सावंत, महादेव भिसे, आत्माराम गवस, अतुल बोंद्रे, राधा बर्वे, प्रवीण बोरकर, डायमंड लोबो तसेच निसर्गाच्या संवर्धनाबाबतचे मान्यवर उपस्थित होेते. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal corporation will cooperate with the Board meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.