सावंतवाडी नगर पालिकेने हटवलेल्या स्टाॅलच्या जागेवर तारेचे कुंपन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:12 PM2021-04-09T21:12:14+5:302021-04-09T21:22:04+5:30
मागील सहा महिन्यापासून बनली होेती वादग्रस्त
सावंतवाडी : रवी जाधव यांनी लावलेल्या स्टॉलच्या जागेला आता तारेचे कुंपन करण्यात आले आहे. तसेच, या ठिकाणी कुणालाच बसण्यास दिले जाणार नाही, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. मागील सहा महिन्यापासून ही जागा वादग्रस्त बनली होती. रवी जाधव यांनी गांधी चौकात डिक्री केलेल्या जागेत तात्पूरता स्वरूपात स्टॉल उभारला होता. मात्र, हा स्टॉल चांगलाच वादग्रस्त बनला.
पालिकेची मुंदत संपल्यानंतरही स्टॉल तसाच ठेवण्यात आल्याचे कारण देत नगरपालिकेने हा स्टॉल हटवला होता. त्यानंतर जाधव यांनी उपोषणही केले होते. पण, पुन्हा त्याच जागेवर स्टॉल उभारण्यात आल्याने पालिकेकडून काढून टाकण्यात आला होता. गेली सहा महिने हा प्रकार सुरू होता. रवी जाधव यांचा स्टॉल काढल्यानंतर त्या जागेवर अन्य व्यक्ती कोणताही स्टॉल लावत होती. त्यामुळे पालिकेवर सतत टिका होत होती. चार दिवसापूर्वी दलित युथ पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीत येऊन त्याच जागेवर स्टॉल उभा केला होता. त्यानंतर पालिकेने तोही स्टॉल काढून टाकला होता. मात्र, आता नगरपालिकेने याच जागेवर तारेचे कुंपन घालण्याचा निर्णय घेतला. यासाठी नगरपालिकेने जागेचे मोजमापही केले असून, सांयकाळी उशिरापर्यत याच जागेवर तारेचे कुपन घालण्याचे काम सुरू होते. याबाबत पालिका कर्मचारी टि.पी.जाधव यांना विचारले असता या ठिकाणी तारेचे कुंपन उभारण्यात येणार असून आता कुणालाही येथे स्टॉल उभारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.