सिंधुदुर्ग : बागेश्री रमाकांत यांच्या गायनाने संगीत मैफिल सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:02 PM2018-11-30T17:02:47+5:302018-11-30T17:04:46+5:30

कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्या वतीने आशिये दत्त क्षेत्र येथे 23 वी गंधर्व मासिक शास्त्रोक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या कन्या व युवा पिढीच्या सुप्रसिद्ध गायिका बागेश्री रमाकांत यानी शास्त्रोक्त संगीताच्या विविध रुपाने ही मैफिल सजवली. यानिमित्ताने रसिकाना एक चांगला स्वरानुभव त्यांनी उपलब्ध करून दिला.

Music concert in singing by Bageshree Ramakant | सिंधुदुर्ग : बागेश्री रमाकांत यांच्या गायनाने संगीत मैफिल सजली

 आशिये येथे आयेजित गंधर्व संगीत सभेत बागेश्री रमाकांत यांनी सुमधुर गीते सादर केली.

googlenewsNext
ठळक मुद्देबागेश्री रमाकांत यांच्या गायनाने संगीत मैफिल सजलीआशिये येथे गंधर्व फाऊंडेशनचे आयोजन

कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्या वतीने आशिये दत्त क्षेत्र येथे 23 वी गंधर्व मासिक शास्त्रोक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या कन्या व युवा पिढीच्या सुप्रसिद्ध गायिका बागेश्री रमाकांत यानी शास्त्रोक्त संगीताच्या विविध रुपाने ही मैफिल सजवली. यानिमित्ताने रसिकाना एक चांगला स्वरानुभव त्यांनी उपलब्ध करून दिला.

बागेश्री रमाकांत यांनी त्यांचे वडिल गझलनवाझ भीमराव पांचाळे तसेच किराणा घराण्याच्या अर्चना कान्हेरे,ग्वाल्हेर घराण्याच्या अपूर्वा गोखले यांच्याकडून तालीम हस्तगत केली. आपल्या वैशिष्ट्य पूर्ण गायकीने त्यांनी रसिकाना अनेकवेळा मंत्रमुग्ध केले आहे. त्याना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत.

त्यामुळे बागेश्री रमाकांत यांची मैफिल रसिकांसाठी एक महापर्वणीच ठरली . त्यांनी मैफिलिची सुरुवात राग 'मधुवंती' मधील बंदिशीने केली व तराणा सादर केला. त्यानंतर उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी व धाडीला राम तिने का वनी? या नाटकातील 'घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला'हे पद सादर केले. रसिकांनी त्याला मनापासून दाद दिली.

त्यांच्या 'तू फुलांचा घोस माझा',स्वप्नात काल माझ्या येऊन कोण गेले, 'उघड्या पुन्हा जाहल्या (शोभा गुर्टु) या व शेवटी 'आस वाना त्रास नको'या गझलांच्या सादरीकरनानंतर त्यानी मैफिल एका उंचीवर नेऊन ठेवली . संजय कात्रे यानी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यानी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत आपला सांगितिक प्रवास कथन केला. गंधर्व सभेच्या शास्त्रोक्त संगीत सभा आयोजनाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

त्याना तबलासाथ सुप्रसिद्ध तबला वादक प्रसाद करंबेळकर व हार्मोनियम साथ अभिनय रवंदे यानी केली.ही गंधर्व संगीत सभा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीराम गवंडळकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रायोजित केली होती.शाम सावंत यानी प्रास्ताविक केले.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बाळ फोंडके यांच्या हस्ते उपस्थित कलाकारांचे स्वागत करण्यात आले. युवा शास्त्रोक्त संगीत आयकॉन रमाकांत गायकवाड(बागेश्री यांचे पती) यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. त्यांचा दामोदर खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुप्रसिद्ध गझलकार मधुसुदन नानिवडेकर तसेच जिल्ह्यातील नामवंत कलाकार व संगीत रसिक या सभेला उपस्थित होते.

ही गंधर्व सभा यशस्वीतेसाठी मनोज मेस्त्री,अभय खडपकर, शाम सावंत, दामोदर खानोलकर,सागर महाडिक, संतोष सुतार,किशोर सोगम,विलास खानोलकर, राजू करंबेळकर व बाबू गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

16 डिसेंबर रोजी 24 वी गंधर्व सभा !

पुढील 24 वी गंधर्व संगीत सभा 16 डिसेंबर रोजी मुंबईतील सुप्रसिध्द हार्मोनियमवादक आदित्य ओक आपल्या हार्मोनियम एकलवादनाने सजवणार आहेत. गंधर्व संगीत सभेची हि द्वितीय वर्षपूर्ती असल्याने या सभेसाठी रसिकानी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: Music concert in singing by Bageshree Ramakant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.