गुढ उलगडले बेपत्ता मनोहर घरी परतला; पोलीस शोधणार यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 08:55 AM2021-09-25T08:55:31+5:302021-09-25T08:57:04+5:30
सावंतवाडीतील खाजगी बॅक कर्मचारी मनोहर प्रभाकर गावडे याच्या बेपत्ता होण्याचे गुढ अखेर आठव्या दिवशी उलगडले.
सावंतवाडी: सावंतवाडीतील खाजगी बॅक कर्मचारी मनोहर प्रभाकर गावडे याच्या बेपत्ता होण्याचे गुढ अखेर आठव्या दिवशी उलगडले असून,तो आपल्या कारिवडे तील घरी आल्याचे समोर आले असून पोलीस ही घराकडे रवाना झाले असून मनोहर याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब घेणार आहे.मात्र सतत आठवडा भर या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.पोलीस ही घडलेल्या घटनेने चक्रावून गेले होते.
सावंतवाडीतील खाजगी बँकेतील कर्मचाऱ्यांची आठवड्या पूर्वो ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली होती. कर्मचाऱ्याने कार मध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती.त्यामुळे त्या युवकांचा गेले आठवडाभर नदी मध्ये शोध घेण्याचे काम सुरू होते मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये चौघांची नाव होती त्यावरून पोलीस तपास करत होते.त्यातील दोघांची चौकशी केली तर अन्य दोन जण फरार आहेत.
दरम्यान पोलीसांनी मनोहर च्या बेपत्ता होण्याचे पोस्टर ही शहरात ठिकठिकणी लावले होते पोलीस आठवडाभर शोध घेत होते दिवसेंदिवस पोलीस तपास आणि मनोहर च्या बेपत्ता होण्यामागचे गुढ वाढत असतनाच शनिवारी पहाटे मनोहर आपल्या कारिवडेतील घरी परतला असल्याचे पुढे आले असून पोलीस घराकडे रवाना झाले आहेत.याबाबत तपास अधिकारी तैसिफ सय्यद यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला असून भावाने फोन करून मनोहर घरी आल्याचे आम्हाला कळवले असल्याचे सय्यद यांनी सागितले.