नॅक'चा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 PM2021-03-04T17:04:08+5:302021-03-04T17:05:53+5:30
Education Sector college sindhudurg- शैक्षणिक दर्जा, दर्जेदार सुविधा, तंत्रज्ञान आणि महाविद्यालयामार्फत राबविले गेलेले समाजोपयोगी उपक्रम यांसह विविध घटकांचे मुल्यमापन करुन 'नॅक' समितीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी दिली.
वैभववाडी: शैक्षणिक दर्जा, दर्जेदार सुविधा, तंत्रज्ञान आणि महाविद्यालयामार्फत राबविले गेलेले समाजोपयोगी उपक्रम यांसह विविध घटकांचे मुल्यमापन करुन 'नॅक' समितीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला 'अ' दर्जा दिला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी दिली.
डॉ. काकडे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. यावेळी संस्थेच्या स्थानिय समितीचे अध्यक्ष सज्जन रावराणे, संचालक शैलेंद्र रावराणे, प्रा. वंदना काकडे, प्रा.आनंद कांबळे, अधिक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.
काकडे म्हणाले, २६ व २७ फेब्रुवारीला 'नॅक'च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयात मुल्यमापन केले. त्या समितीत बिहारच्या डॉ. सी. व्ही रमण विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. आर. के पांडे, सिक्कीम विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुधांशु महापात्रा, उत्तराखंड येथील पी.जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनय बोराई यांचा समावेश होता. यापुर्वी २००४ मध्ये 'सी' ग्रेड, २०१२ मध्ये 'बी' प्राप्त झाली होती. आता २०१३ ते २०१९ या कालावधीतील कामांचे मुल्यमापन समितीने केले.
काकडे म्हणाले,'महाविद्यालय ग्रामीण भागात असुनही प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी 'नॅक'च्या नवीन प्रणालीला चांगल्या पध्दतीने सामोरे केले. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे आणि संचालक मंडळाने यांनी देखील चांगले सहकार्य केले. सांघिक कामामुळेच 'ए' ग्रेड प्राप्त झाली असे त्यांनी सांगितले.
आता लक्ष 'ए प्लस'चे
महाविद्यालयाला 'ए' ग्रेड प्राप्त झाली असुन ही आमच्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. परंतु, ही ग्रेड टिकविण्यासोबत आता आम्ही अधिक जोमाने काम करुन 'ए प्लस' मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी व्यक्त केले.