‘नगरपंचायत’चा बिगुल वाजणार
By admin | Published: June 28, 2016 10:42 PM2016-06-28T22:42:49+5:302016-06-28T22:44:26+5:30
देवगड-जामसंडे निवडणूक : प्रभाग रचना, आरक्षण, सोडतीचा कार्यक्रम नगरविकासकडून जाहीर
अहमदनगर : केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार, अनाथ मुलांच्या कौशल्यवृद्धी व रोजगार निर्मितीसाठी संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पतरू शैक्षणिक संकुलाचे मंगळवारी डॉ़ संजय उपाध्ये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ चरखा व तीस हजार रुपयांची देणगी देऊन उपाध्ये यांनी उद्घाटन केले़
या प्रकल्पात समाजातील निराधार, वंचित, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, आई-वडील सोडून गेलेल्या मुलामुलींसाठी निवासी कल्पतरू शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. या संकुलात सेंद्रीय शेती, चरखा प्रशिक्षण, सुतार काम, वेल्डिंग, पेंटिंग, प्लंबिंग, फूड प्रोसेसिंग व विविध आद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी उपाध्ये म्हणाले, आजपर्यंत सावली संस्थेने निराधार मुलांच्या स्वावलंबनासाठी गेल्या पंधरा वर्षांत व्यापक काम केले आहे़ आजपर्यंत शेकडो मुलांना सावलीचा आधार मिळाला आहे़ मुलं चांगले आयुष्य जगत आहेत. निराधार, वंचित मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वविकास, स्वावलंबन व श्रमसंस्कारातूनच समाज विकास होईल. समाजाला प्रेरणा देणारे कार्य सावलीमध्ये होत आहे.
समाजातील निराधार मुलांना कुटंुब व मुलांचे अधिकार न मिळाल्याने ही मुले शोषणाला बळी पडतात, अथवा गुन्हेगारीकडे वळतात. कल्पतरू शैक्षणिक संकुलामुळे ही मुले स्वत:च स्वावलंबी होऊन चांगले नागरिक बनतील, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मादगीकर यांनी केले. कल्पतरू शैक्षणिक संकुलाची जबाबदारी सावलीतील माजी विद्यार्थी तुषार देशमुख, विशाल चव्हाण, मोनिका पैठणपगारे, राहुल कांबळे, एकनाथ भुजबळ, प्रवीण चव्हाण हे पाहणार आहेत. कल्पतरू शैक्षणिक संकुलासाठी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत तीन एकर जागेची आवश्यकता असून दानशूर व्यक्तींनी या कार्यात सहभागी होऊन जमिनीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. प्रास्ताविक नितेश बनसोडे यांनी केले. आभार राहुल कांबळे यांनी मानले.