सावंतवाडी रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांचे नाव द्या, विनायक राऊत यांची मागणी
By अनंत खं.जाधव | Published: December 21, 2023 04:44 PM2023-12-21T16:44:05+5:302023-12-21T16:44:32+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ते काम लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच सावंतवाडी ...
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ते काम लवकरात लवकर मार्गी लागावे तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते असे करण्यात यावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
खासदार राऊत यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची बुधवारी दिल्ली येथे भेट घेतली व कोकण रेल्वे प्रश्नावर चर्चा केली. यात प्रामुख्याने कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वे लाईनचे काम लवकर सुरू व्हावे त्या मार्गाचा सर्व्हे झाला आहे येणाऱ्या अर्थसंकल्पात या रेल्वे लाईन साठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.
तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे काम बरीच वर्षे प्रलंबित आहे. हे काम लवकर पूर्ण झाल्यास तेथे अनेक लांब पल्याच्या गाड्यांना थांबा मिळू शकेल तसेच टर्मिनसचे काम अपूर्ण असल्यामुळे सध्या या स्थानकावर लांब पाल्याच्या गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना तरी थांबा द्यावा तसेच जानेवारी २०२४ पासून नवीन रेल्वे गाड्या सोडाव्यात अशीही मागणी केली. आदी. मागण्याचा गंभीरपूर्वक विचार करावा आणि स्थानकाचे नामकरण करावे असे या निवेदनात म्हटले आहे.