विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:37 PM2020-08-10T16:37:31+5:302020-08-10T16:40:10+5:30

विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते.

Narayan Rane inspects the fall of Vijaydurg fort | विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची नारायण राणेंकडून पाहणी

अतिवृष्टीत ढासळलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी खासदार नारायण राणे यांनी केली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, रवींद्र पाळेकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते. (छाया : वैभव केळकर )

Next
ठळक मुद्देकिल्ला दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार

देवगड : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी  किल्ले विजयदुर्गच्या पडझडीची पाहणी केली. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि त्या खात्याचे केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून विजयदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते.

या पहाणी दौऱ्यात माजी आमदार अजीत गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुका अध्यक्ष रवींद्र पाळेकर, जिल्हा परिषद सभापती सावी लोके, सभापती सुनील पारकर, माजी सभापती संजय बोंबडी, सरपंच प्रसाद देवधर, नगराध्यक्ष प्रणाली माने, तहसीलदार मारुती कांबळे, जिल्हा सचिव अरब बगदादी, युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, महिला मोर्चा अध्यक्षा संजना आळवे, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, प्रकाश राणे, उपसरपंच महेश बिडये, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर, स्थानिक अध्यक्ष ग्रेसीस फर्नांडिस, प्रदीप सारखरकर आदींसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय पुरातत्व विभागाचे लक्ष वेधणार
विजयदुर्ग किल्ल्याचा ऐतिहासीक ठेवा जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. केंद्रीय पुरातत्व विभागाचे या किल्ल्याच्या पडझडीकडे लक्ष वेधण्यात येईल, असेही राणे यांनी या पाहणी दौऱ्यात स्पष्ट केले.


 

Web Title: Narayan Rane inspects the fall of Vijaydurg fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.