नारायण राणेंची अवस्था बघून वाईट वाटते - दलवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:18 AM2017-10-16T05:18:00+5:302017-10-16T05:18:09+5:30

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपामध्ये जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला. मात्र त्यांना भाजपाने प्रवेश दिला नाही. आता स्वतंत्र पक्ष काढून त्यांची जी अवस्था झाली आहे ते बघून वाईट वाटते, असा

 Narayan Rane is sad to see the situation - Dalwai | नारायण राणेंची अवस्था बघून वाईट वाटते - दलवाई  

नारायण राणेंची अवस्था बघून वाईट वाटते - दलवाई  

Next

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपामध्ये जाण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला. मात्र त्यांना भाजपाने प्रवेश दिला नाही. आता स्वतंत्र पक्ष काढून त्यांची जी अवस्था झाली आहे ते बघून वाईट वाटते, असा चिमटा काँग्रेस नेते खा. हुसेन दलवाई यांनी काढला. राणेंच्या पक्षाने भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जसा पाठिंबा दिला, तसा भविष्यात काँग्रेसप्रणित ‘यूपीएला’ही ते पाठिंबा देऊ शकतात, असे भाकित त्यांनी वर्तविले.
सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दलवाई म्हणाले, राजकारणात जर-तर वर विश्वास ठेवायचा नसतो. त्यामुळे पुढचे राजकारण कसे असेल, कोणी सांगू शकणार नाही. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना भाजपा घेईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्यास सांगितले. पण आता पक्षाची अवस्था काय आहे, ते त्यांनीच बघावे. राणेंची अवस्था बघून मला व्यक्तीश: वाईट वाटते, असेही त्यांनी सांगितले.
खोटे आरोप करण्याची सवय
राणे यांना नेहमीच खोटे आरोप करण्याची सवय पडली आहे. त्यामुळेच माझ्यावर खासदार निधीची कामे देताना टक्केवारी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही दलवाई यांनी दिले.

Web Title:  Narayan Rane is sad to see the situation - Dalwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.