नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, कणकवलीत भाजपकडून आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:12 PM2021-07-08T12:12:30+5:302021-07-08T12:15:19+5:30

Narayan Rane Sindhudurg : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच गुरुवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. त्यामुळे कणकवली शहरामधील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Narayan Rane was sworn in as a cabinet minister | नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, कणकवलीत भाजपकडून आनंदोत्सव

कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते तसेच नागरिकांना जिलेबी वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

Next
ठळक मुद्दे नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथकणकवलीत भाजपकडून आनंदोत्सव

कणकवली : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच गुरुवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. त्यामुळे कणकवली शहरामधील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते नागरिक व भाजप कार्यकर्त्यांना जिलेबी वाटप करण्याबरोबरच फटाकेही वाजविण्यात आले.कणकवलीतील चौकाचौकात मंत्री नारायण राणे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले असल्याने शहरातील वातावरण भाजपमय झाले आहे.

नागरिकांना जिलेबी वाटप करताना भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर,कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, अण्णा कोदे, शिशिर परूळेकर, विराज भोसले, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण,गणेश तांबे, श्यामसुंदर दळवी, महिला शहरअध्यक्षा प्राची कर्पे,सदडेकर,साक्षी वाळके,राजन परब,विठ्ठल देसाई, सुशील पारकर,गणेश तळगावकर, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Narayan Rane was sworn in as a cabinet minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.