नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत
By admin | Published: June 6, 2016 11:59 PM2016-06-06T23:59:17+5:302016-06-07T07:32:05+5:30
काँगे्रसमध्ये नवचैतन्य : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी; विजयी घोषणांनी परिसर दणाणला
बांदा : विधानपरिषदेत बिनविरोध आमदारपदी निवडून आल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर बांदा येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि राणे यांच्या विजयी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिसर फुलून गेला होता.
बांदा येथील कट्टा कॉर्नर चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजू परब यांनी नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
तसेच नारायण राणे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. राणे यांच्या आमदारकीने जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सभापती आत्माराम पालयेकर, गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती प्रमोद कामत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, विकास सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, एम. के. गावडे, प्रज्ञा परब, दिगंबर पाटील, समीर नलावडे, रणजीत देसाई, मालवण नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, स्नेहा आचरेकर, नासीर काझी, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, सावंतवाडी सभापती प्रमोद सावंत, बाळा गावडे, गुरुनाथ सावंत, संजीव शिरोडकर, सुधीर आडिवरेकर, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे, बबन राणे, डेगवे उपसरपंच मधु देसाई, डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, तात्या वेंगुर्लेकर, बाळु सावंत, स्वप्निल नाईक, सिध्देश महाजन, तेजस परब, युवक शहर अध्यक्ष संदीप बांदेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे यांनी शुभेच्छांचा स्विकार करीत कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कार्यरत व्हावे, असे कार्यकर्त्यांना
आवाहन केले. (प्रतिनिधी)