Sindhudurg- नाटळ ग्रामसभा मारहाण प्रकरण: माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सावंत यांना सशर्थ जामीन मंजूर
By सुधीर राणे | Published: August 19, 2024 05:01 PM2024-08-19T17:01:23+5:302024-08-19T17:02:17+5:30
कणकवली: तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला. ...
कणकवली: तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला. तसेच किशोर परब, महेंद्र गुडेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पांडुरंग सावंत याची २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी दिले आहेत.
३ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता नाटळ ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सावंत हा आपण दिलेल्या पत्रावर तत्काळ उत्तर द्या, असे बोलून तो सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी तक्रारदार दिनानाथ सावंत हे अडवायला गेले. तेव्हा गणेश याने आणलेल्या धारधार चाकूने तक्रारदाराच्या डोक्यावर गंभीर वार केले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अभिषण सावंत, पद्माकर पांगम, पंढरी पांगम, प्रदीप सावंत यांनी तक्रारदाराला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
साक्षीदार किशोर परब व महेंद्र गुडेकर हे तक्रारदाराला सोडविण्यासाठी गेले असता रमाकांत घाडीगांवकर, सचिन सावंत, सुनिल जाधव, संजय सावंत, रमेश नाटळकर, अविनाश सावंत यांनी त्याना लाथाबुक्क्याने व प्लास्टिक खुर्च्यांनी मारहाण केली. त्यानुसार १३ आरोपीविरूद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी दोन वेळा संबधित आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केलेला होता.
याप्रकरणी सचिन सावंत याच्यावतीने दाखल केलेल्या जामिन अर्जावर वकिलानी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीची २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर सशर्थ मुक्तता करताना, साक्षीदारांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाब आणू नये. अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात सहकार्य करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.