काजूपिकाबाबत राष्ट्रीय परिषद
By admin | Published: February 18, 2016 12:23 AM2016-02-18T00:23:07+5:302016-02-18T21:14:17+5:30
वेंगुर्लेत आयोजन : दापोली कृषी विद्यापिठाचा उपक्रम
वेंगुर्ले : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली, काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची आणि ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे काजूपीक विकासासंबंधीची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटनाला पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, परिषदेचे अध्यक्ष डॉ. तपस भट्टाचार्य, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठ शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जीवन तलाठी, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. भरत साळवी आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कृषी प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये काजूपीक सुधारणा, शाश्वत काजूपीक व्यवस्थापन, बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा अवलंब, काजूपीक मूल्यवर्धनासाठी मूल्यवर्धन साखळी व्यवस्थापन, काजूपीकावरील कीडरोग, हवामानानुसार त्यांचे नियंत्रण आणि काजूपीक विकासाचे सामाजिक व आर्थिक घटक या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. काजू विकासासंबंधी देशभरातील १०० हून अधिक शास्त्रज्ञ संशोधनपर लेख सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)