राष्ट्रीय पतंग महोत्सव ठरला यादगार, मालवण दांडी किनारा बनला पतंगमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:27 PM2019-01-30T16:27:37+5:302019-01-30T16:28:54+5:30

मालवण दांडी किनाऱ्यावर आयोजित केलेल्या पहिल्या-वाहिल्या पतंग महोत्सवाला बच्चेकंपनीसह पतंगप्रेमींनी उत्स्फूर्त मिळाला. आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतील पतंग महोत्सव मालवणवासियांसाठी यादगार ठरला.

National Kite Festival became a memorable, Malvan dandy made of moth | राष्ट्रीय पतंग महोत्सव ठरला यादगार, मालवण दांडी किनारा बनला पतंगमय

राष्ट्रीय पतंग महोत्सव ठरला यादगार, मालवण दांडी किनारा बनला पतंगमय

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय पतंग महोत्सव ठरला यादगार, वैभव नाईकांची संकल्पना मालवण दांडी किनारा बनला पतंगमय

मालवण : मालवण दांडी किनाऱ्यावर आयोजित केलेल्या पहिल्या-वाहिल्या पतंग महोत्सवाला बच्चेकंपनीसह पतंगप्रेमींनी उत्स्फूर्त मिळाला. आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतील पतंग महोत्सव मालवणवासियांसाठी यादगार ठरला.

महोत्सवाचे उदघाटन भाजप नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे आमदार नाईक यांनी सहकुटुंब पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरानजीकच्या किना?्यावर आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून आणि मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, भाजप नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, अवधूत मालणकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, उमेश नेरुरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन शिंदे, सेजल परब, गणेश कुडाळकर, सन्मेश परब, पंकज साधये, बाबी जोगी, किसन मांजरेकर, अक्षय रेवंडकर, महेश शिरपुटे, प्रवीण रेवंडकर, अन्वय प्रभू, किरण कारेकर आदी उपस्थित होते.

मालवण-कुडाळ मतदारसंघाला प्रत्येक घराशी संपर्क असलेला आणि विकासाची दूरदृष्टी असलेला आमदार लाभला आहे. आमदार नाईक यांच्या रूपाने मालवणच्या विकासाला नवी सुरुवात झाली आहे. त्यांनी विकासकामांचा लावलेला धडाका पाहून महाराष्ट्रात त्यांचा गौरव केला जातो. तरुणांना बेरोजगार मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असून आगामी निवडणुकीत नाईक हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील व त्यापुढेही विकासकामे मार्गी लावतील, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

पर्यटनाला चालना देणार

मालवणच्या पर्यटन वाढीसाठी जेवढे करता येईल तेवढे करण्याचा माझा मानस आहे. भविष्यात दांडी बीच विकसित केले जाणार आहे. दांडी किनारी आता दरवर्षी पतंग महोत्सव आयोजित करून पर्यटनाला चालना दिली जाईल, असे आश्वस्त करताना आमदार वैभव नाईक म्हणाले, कुडाळ- मालवण रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच मालवण-आचरा रस्त्याच्या कामालाही सुरुवात होईल. आणि कसाल मालवण रस्ता निवडणुकीआधी पूर्ण करेन आणि त्यानंतरच निवडणुकीला उभा राहीन.

Web Title: National Kite Festival became a memorable, Malvan dandy made of moth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.