राष्ट्रवादीकडून जानवली नदीवर बंधारा, नागरिकांमध्ये समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:35 PM2017-12-13T23:35:59+5:302017-12-13T23:36:06+5:30
कणकवली येथील नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरालगत जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधण्यात आला.
कणकवली : कणकवली येथील नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरालगत जानवली नदीवर गणपती साना येथे बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, तालुकाध्यक्ष विलास गावकर, जिल्हा सरचिटणीस राजेश पाताडे, शहराध्यक्ष इम्रान शेख,अनिस नाईक, युवक शहर अध्यक्ष निशीकांत कडुलकर, तालुका उपाध्यक्ष सागर वारंग,शिवडाव ग्रामपंचायत उपसरपंच सतीश पाताडे, रविकांत सावंत, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोहर मालंडकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, शहर चिटणीस अमित केतकर, दिपेश सावंत सचिन अडुलकर, सत्यवान कानडे, जहिर फकीर, बाळ वाळके, मंगेश मसूरकर,अंकुश मेस्त्री, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे आदी उपस्थित होते.
जानवली नदीवर गणपतीसाना येथे हा बंधारा बांधण्यात आल्यामुळे त्या जवळच्या सगळ्या विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कणकवली येथील जानवली नदीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी बंधारा बांधण्यात आला. यावेळी अबिद नाईक तसेच राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.