cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:02 PM2020-06-10T15:02:32+5:302020-06-10T15:05:13+5:30

निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

Nature cyclone causes loss of Rs 4 crore in the district | cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

Next
ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसानवीज वितरण कंपनीला सर्वाधिक ३ कोटींचा फटका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळसिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशाच्या पश्चिम किनाऱ्याला निसर्ग या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. हे वादळ कोकण किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज होता. त्यामुळे गोव्यासह मुंबई पर्यंतच्या किनारपट्टीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक सर्व खबरदारी सर्व जिल्हा प्रशासनानी घेतली होती.

या वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही होईल असा अंदाज होता. मात्र, हे चक्रीवादळ सरकत रायगडच्या दिशेने गेले आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर आदळल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचला असला तरीही या वादळाचा बराच परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोगावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही घरांची पडझड, विद्युत खांबांची पडझड, पाटबंधारे विभागाचे नुकसान, काजू कारखान्याचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले. या निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे बऱ्यापैकी पंचनामे झाले आहेत.

या नुकसानीमधे सर्वात जास्त विद्युत विभागाचे नुकसान झाले आहे. या विभागाचे सुमारे २ कोटी ८९ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हे वादळ आणि पाऊस यामुळे जिल्ह्यातील बरीच घरे पूर्णत:, अंशत: कोसळली आहेत. यामुळे या सर्वांचे एकूण ३७ लाख १९ हजार ५०५ रुपये एवढे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे नुकसान झाल्याने यापोटी ४२ हजार ४४० रुपयांचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड होऊन ५ हजार, पाटबंधारे विभागाचे ६५ लाख रुपयांचे आणि काजू कारखान्यांचे २३ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे.

नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता

निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. या निसर्ग चक्रीवादळामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त विद्युत विभागावर झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांची नुकसानी झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनास कळविण्यात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. अजून बºयाच विभागांची माहिती येणे बाकी आहे.

Web Title: Nature cyclone causes loss of Rs 4 crore in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.