कणकवलीत ११ मार्चपासून नाट्य महोत्सव!, नाट्यरसिकांना पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:48 PM2022-03-03T13:48:09+5:302022-03-03T13:48:28+5:30
नटसम्राट मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन
कणकवली: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ११ते १६ मार्च या कालावधीत प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात नटसम्राट मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नाट्यरसिकांना विविध विषयांवरील नाटके पाहता येणार असून त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे.
११ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता व रात्री ९ .३० वाजता प्रदीप वैद्य लिखीत व दिग्दर्शित 'काजव्यांचा गाव ' हे नाटक सादर होईल . १२ मार्च रोजी रात्री ९ वाजता पियूष मिश्रा लिखीत व शंतनू पाटील दिग्दर्शित काफिला कोल्हापूरनिर्मित 'गगन दताना माज्या ' हे नाटक सादर होईल. १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता धनंजय सरदेशपांडे लिखीत व रुपाली गोडंबे दिग्दर्शित 'फारचं टोचलयं' तर रात्री १०.३० वाजता राजेंद्र चव्हाण लिखीत मित्र शिरगावनिर्मित ' मनदेशी माणसे ' हे नाटक सादर होईल.
१४ मार्च रात्री ९ वाजता मृणालिनी बनारसे लिखीत व विद्यानिधी बनारसे दिग्दर्शित ' डार्विन ' तर रात्री १०.३० वाजता आदिती व्यंकटेशन लिखीत व विद्यानिधी वनारसे दिग्दर्शित आयपारनिर्मित ' फॉल अगेन फ्लाय बेटर ' हे नाटक सादर होईल . १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता व रात्री ९.३० वाजता रामू रामनाथन लिखीत अतुल पेठे दिग्दर्शित नाटकघर पुणे निर्मित ' शब्दांच्या रोजनिशी ' हे नाटक सादर होईल. १६ मार्च रोजी रात्री ९ वाजता' दास्तान-ए-बडी बांका' हे नाटक सादर होईल.
नाट्यरसिकांनी या नाट्यउत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड. नारायण देसाई, कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.