सावंतवाडीत १३ पासून नाट्यमहोत्सव

By Admin | Published: February 7, 2016 09:11 PM2016-02-07T21:11:23+5:302016-02-08T00:57:55+5:30

दिनकर धारणकर स्मृती : नगरपालिकेचा पुढाकार

Natya Mahotsav from Sawantwadi to 13 | सावंतवाडीत १३ पासून नाट्यमहोत्सव

सावंतवाडीत १३ पासून नाट्यमहोत्सव

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी येथे स्व. दिनकर धारणकर यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यमहोत्सव २०१६ चे आयोजन केले आहे. दि. १३ ते १५ दरम्यान तीन दिवस हा महोत्सव येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे.
सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाहेर स्व. दिनकर धारणकर व शशिकला सावंत यांची तैलचित्रे लावण्यात येणार असून, त्यांचे अनावरण १४ फेबु्रवारीला सायंकाळी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. ते नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू, साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर, लक्ष्मण नाईक, संदीप धुरी, गुरूनाथ चिटणीस उपस्थित होते. दिनकर धारणकर यांनी नाट्यक्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची आठवण म्हणून नाट्यमहोत्सव होत असून, क्षितिज इव्हेंट आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती क्षितिज इव्हेंटचे बाळ पुराणिक यांनी दिली. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, धारणकर हे सावंतवाडी सोडून मुंबई येथे गेले असते तर अनेक कलाकार त्यांनी घडवले असते. उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आजही सावंतवाडीवासीय पाहतात. त्यामुळेच त्यांच्या नावाने गेल्यावर्षीपासून नाट्यमहोत्सव भरवला जातो. यावर्षीही नाट्यमहोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ते १५ फेबु्रवारी असे तीन दिवस नाट्यमहोत्सव चालणार असून, ‘कट्यार काळजात घुसली’ तसेच ‘एक दिवस मठाकडे’ व ‘तो खिडकी’ अशी विविध नाटके या महोत्सव ठेवली आहेत. या निमित्ताने १४ फेबु्रवारीला अभिनेते अभय खडपकर यांच्या हस्ते येथील बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाहेर नाट्यकर्मी स्व. दिनकर धारणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.
धारणकर यांच्याबरोबरच कै. शशीकला सावंत यांचेही तैलचित्र लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले. ही तैलचित्रे कायमस्वरूपी असणार असून, धारणकर यांच्या नाट्यक्षेत्रातील कामाबाबत आजही सावंतवाडीवासीयांच्या मनात आदर आहे. (प्रतिनिधी)

१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस चालणार
कट्यार काळजात घुसली, एक दिवस मठाकडे अशा विविध नाटकांची मांदियाळी

Web Title: Natya Mahotsav from Sawantwadi to 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.