सिंधुदुर्गमध्ये नौदलाचा मच्छिमार बांधवांशी संवाद; सागरी सुरक्षा, नौदल प्रवेशाबाबत केले मार्गदर्शन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 13, 2024 12:25 PM2024-07-13T12:25:23+5:302024-07-13T12:26:39+5:30

सिंधुदुर्ग : नौदल तर्फे महा कनेक्ट कार ड्राईव्ह २०२४ हा उपक्रम ८ ते १८ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. ...

Navy interaction with fishermen brothers in Sindhudurg; Gave guidance on maritime security, naval access  | सिंधुदुर्गमध्ये नौदलाचा मच्छिमार बांधवांशी संवाद; सागरी सुरक्षा, नौदल प्रवेशाबाबत केले मार्गदर्शन 

सिंधुदुर्गमध्ये नौदलाचा मच्छिमार बांधवांशी संवाद; सागरी सुरक्षा, नौदल प्रवेशाबाबत केले मार्गदर्शन 

सिंधुदुर्ग : नौदल तर्फे महा कनेक्ट कार ड्राईव्ह २०२४ हा उपक्रम ८ ते १८ जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत  जिल्हातील सर्व सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार बांधव यांना सागरी सुरक्षेचे महत्व तसेच भारतीय नौदलामध्ये प्रवेश करण्याबाबतचे मार्गदर्शन मालवण येथे करण्यात आले.  मासेमारी समुदाय, सागर रक्षक दलाच्या समस्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यांवर सामुदायिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 नौदलाच्या कमांडर आसिफ मुल्ला, कमांडर सौजन्या कमांडर अंकेश बुंदेला यांनी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस घ्यावयाची काळजी, मासेमारी करताना घ्यावयाची काळजी, कलर कोडींग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी, सागर सुरक्षा, भारतीय नौसेनेमध्ये नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर तसेच मच्छीमार समुदाय व सागर रक्षक दलाच्या तसेच किनारपट्टी सुरक्षेच्या मुद्द्यावर सामुदायिक संवाद साधून मार्गदर्शन केले. 

संवाद या नौदलाच्या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे मालवण पोलिस स्टेशन, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मालवणकर, सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, पोलिस पाटील, सागर रक्षक दल सदस्य, मच्छिमार समुदाय, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Navy interaction with fishermen brothers in Sindhudurg; Gave guidance on maritime security, naval access 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.