पारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:29 PM2021-03-23T19:29:06+5:302021-03-23T19:30:46+5:30

malvan fishrman sindhudurg : एलईडी मासेमारीस बंदी असतानाही केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळेच कारवाई होत नसून यामुळेच वाद निर्माण होत आहे. एलईडीसह अनधिकृतरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसून अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. हे अधिकारी दबावाखाली वावरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.

NCP office bearers pay homage to traditional fishermen's chain fast | पारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट

मच्छिमारांनी मत्स्य विभाग कार्यालयासमोर छेडलेल्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भेट दिली.

Next
ठळक मुद्देपारंपरिक मच्छिमारांच्या साखळी उपोषणास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली भेट पर्ससीन कारवाईबाबत मत्स्य विभागाची भूमिका संशयास्पद :अमित सामंत

मालवण : एलईडी मासेमारीस बंदी असतानाही केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळेच कारवाई होत नसून यामुळेच वाद निर्माण होत आहे. एलईडीसह अनधिकृतरीत्या होणार्‍या पर्ससीनच्या मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसून अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. हे अधिकारी दबावाखाली वावरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला.

मालवण येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस राज्य सरचिटणीस व्हिक्टर डांटस, काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्‍वास साठे, आगोस्तीन डिसोझा, भास्कर परब, नझीर शेख, शिवाजीराव घोगळे, उत्तम सराफदार, बाबू डायस, सुजन खोबरेकर, सलिम खान, अँथोनी फर्नांडिस, सदाफ खटखटे, रेजिना डिसोझा, सारीका डायस, प्रमोद कांडरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पारंपरिक मच्छीमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर छेडलेल्या साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सामंत म्हणाले, देशात एलईडी मासेमारीला पूर्णतः बंदी असताना त्यावर कारवाईस मत्स्यव्यवसाय विभागास कोणी अडविले आहे? पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण छेडल्यानंतर आचर्‍यातील पर्ससीनच्या नौकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छीमारांच्या ज्या मागण्या आहेत त्याचे पत्र मत्स्य आयुक्तांना देण्यास काहीही हरकत नाही.

पारंपरिक मच्छीमारांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मत्स्यव्यवसायचे अधिकारी एलईडी, पर्ससीनच्या नौकांवर कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आहेत. आमचे गृहमंत्री असल्याने याप्रश्‍नी आम्ही त्यांचे लक्ष वेधू असे अमित सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title: NCP office bearers pay homage to traditional fishermen's chain fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.