सुलभ कर्जासाठी नवीन प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2015 09:27 PM2015-09-02T21:27:02+5:302015-09-02T23:24:43+5:30

सतीश सावंत : कसाल येथे जिल्हा बँक शाखा कार्यालयाचे उद्घाटन

New Experiment for Easy Debt | सुलभ कर्जासाठी नवीन प्रयोग

सुलभ कर्जासाठी नवीन प्रयोग

Next

ओरोस : ग्रामीण भागातील शेतकरी, व्यावसायिक व खातेदारांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज किंवा इतर गोष्टींच्या अडचणींबाबत येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा प्रधान कार्यालयामार्फत नवीन प्रयोग आम्ही करीत आहोत. यामध्ये तुमचीसुद्धा साथ महत्त्वाची आहे. ही बँक तुमची आहे. सिंधुदुर्ग हे नाव असून, त्याचा सर्वांनी अभिमान बाळगावा व आपल्या बँकेच्या नावे ठेवी जमा करून बँकेचे नाव उज्ज्वल करावे, असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बँकेच्या विकास शाखा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.कसाल येथील जिल्हा बँकेच्या विकास शाखा कार्यालयाचे सोमवारी सायंकाळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कसाल सोसायटी चेअरमन राजन परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, प्रमोद धुरी, आत्माराम ओटवणेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, डॉ. प्रशांत कोलते, व्हिक्टर फर्नांडिस, बळिराम परब, ग्रामसेवक व्ही. जी. कोलते, सरपंच निलिमा परकर, बाबा आंगणे, कसाल शाखा व्यवस्थापक सोमा सकपाळ, शाखा विकास अधिकारी संजय पाताडे, संतोष कांदळकर तसेच शाखा कर्मचारी, खातेदार, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.
यावेळी सतीश सावंत म्हणाले, आम्ही शेतकरी बंधूंना घरबांधणीसाठी कर्ज देत असतो. ती जमीन बिनशेती असो किंवा नसो त्या शेतकरी बांधवाला कर्ज देणे आमचे कर्तव्य आहे. तसेच उद्योग, व्यवसाय करणाऱ्या जनतेला व व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार असून, याबाबतची माहिती पुरविली जाणार आहे. सध्या आम्ही जिल्ह्यामध्ये २८ विकास शाखा या नावाने काढत आहोत. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. प्रशांत कोलते यांनी कोणतीही संस्था मोठी करायची असेल, तर सर्वांनी एकजूट करून होत असते. डिपॉझिट ठेवून त्यातून नफा घेणे महत्त्त्वाचे आहे. नॅशनल बँकांच्या तोडीस तोड आपण द्यावयाची असते व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यातूनच मोठी करायची आहे असेही डॉ. कोलते यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिरूद्ध देसाई यांनी केले. (वार्ताहर)

सर्वांनी योजनांचा फायदा घ्या : सावंत
आमच्या जिल्हा बँकेत डॉ. प्रशांत कोलते, व्हिक्टर फर्नांडिस, नलावडे तसेच अन्य ग्रामस्थांनी आमच्याकडे ठेवी जमा केल्या आहेत. आम्ही तुम्हाला जलद सेवा पुरविण्याचे काम करणार आहोत. तुम्हाला बँक चांगली सेवा देईल. आज आमच्या २९ एटीएम शाखा आहेत. पूर्ण जिल्ह्यात बँकेचे नाव आहे. सर्वांनी या योजनांचा फायदा घ्यावा, असेही यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले.

Web Title: New Experiment for Easy Debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.