वैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:38 AM2019-03-16T11:38:20+5:302019-03-16T11:38:58+5:30

वैभववाडी तालुक्यातील सडूरे येथील सारिका सत्यवान काळे या ३२ वर्षीय नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र तिला गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी नेत असताना बांदा येथे निधन झाले. यानंतर तिचा मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

The newly married woman at Vaibhavwadi Sadeure lit a bucket of kerosene | वैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

वैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

googlenewsNext
ठळक मुद्देवैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

वैभववाडी : तालुक्यातील सडूरे येथील सारिका सत्यवान काळे या ३२ वर्षीय नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र तिला गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी नेत असताना बांदा येथे निधन झाले. यानंतर तिचा मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत सारीका काळे हिचे पाच वर्षापूर्वी सत्यवान काळे यांच्याशी लग्न झाले होते. गेली दोन महिने त्या आजारी होत्या. त्यांचे पती येथील विद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी सकाळी पती, सासरे व सासू कामाला गेली होती. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शुक्रवारी सायंकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

सायंकाळी पती, सासरे व सासू घरी आल्यानंतर त्यांना जाळून घेतल्याचे समजताच त्यांनी तात्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यात ती गंभीररित्या भाजली असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी पणजी येथे हलविले. मात्र तिचा बांदा येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत काळे हिला दोन लहान मुली आहेत.

Web Title: The newly married woman at Vaibhavwadi Sadeure lit a bucket of kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.