‘सी वर्ल्ड’बाबत पुढील कार्यवाही ५ आॅगस्टच्या मुंबईतील बैठकीनंतर : भंडारी

By admin | Published: August 3, 2015 11:29 PM2015-08-03T23:29:56+5:302015-08-04T00:02:19+5:30

आॅस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, अमेरिकत सी वर्ल्ड २०० एकरच्या आत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गातील सी वर्ल्डसाठी सुमारे ३५० एकर जागा संपादित केली जाणार आहे.

Next procedure for 'C world' after meeting in Mumbai on 5th August: Bhandari | ‘सी वर्ल्ड’बाबत पुढील कार्यवाही ५ आॅगस्टच्या मुंबईतील बैठकीनंतर : भंडारी

‘सी वर्ल्ड’बाबत पुढील कार्यवाही ५ आॅगस्टच्या मुंबईतील बैठकीनंतर : भंडारी

Next

सिंधुदुर्गनगरी : मालवण तोंडवळी येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पाबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी ५ आॅगस्टला मंत्रालय पातळीवर मुख्यमंत्री व पर्यटन विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ठरलेल्या धोरणानुसारच प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी अर्चना माने, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, सी वर्ल्ड संदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री व पर्यटन विभागाची मुंबई येथे सभा होणार आहे. या बैठकीमध्ये जे काही धोरण ठरेल त्या धोरणानुसारच भूसंपादन करण्यात येईल. आॅस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, अमेरिका या देशांमध्ये जे सी वर्ल्ड आहेत ते २०० एकरच्या आत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्पासाठी सुमारे ३५० एकर एवढीच जागा संपादित केली जाणार आहे. जिल्ह्यात ११ वाळू व्यावसायिकांना वाळू उत्खननाचे परवाने देण्यात आले असून, ३० सप्टेंबरपर्यंत या परवान्यांची मुदत राहणार आहे. पुढील वाळू उत्खननासाठी आॅक्टोबरपासूनच शासनाकडे परवानगी मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


पोलिसांकडून एकही गाडी अडविली गेली नाही
अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट लक्षात घेता शासनाने गेल्या महिनाभरापूर्वी अशी वाहतूक करणाऱ्या वाळू व्यावसायिकांवर वाळूच्या पाचपट दंड व दंड न भरल्यास वाहनाचाही लिलाव करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यात अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईत वाहतूक पोलिसांकडून एकही गाडी अडविली गेली नसल्याची माहिती देण्यात आली.

खाते नंबर घेण्याचे काम सुरू
सिंधुदुर्गातील आंबा व काजूच्या नुकसानभरपाईपोटी ३७ कोटी मंजूर झाले असून, ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे त्या संबंधित शेतकऱ्यांचे खाते नंबर गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.


लोकशाही दिनात ६ अर्ज प्राप्त
आजच्या लोकशाही दिनात एकूण सहा अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २ अर्ज तत्काळ निकाली काढण्यात आले. या अर्जांमध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Next procedure for 'C world' after meeting in Mumbai on 5th August: Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.