आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच - निलेश राणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 10:32 PM2023-03-03T22:32:30+5:302023-03-03T22:33:22+5:30

भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा मालवण शहर येथील दैवज्ञ भवन सभागृहात भव्यदिव्य पद्धतीने मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. 

Nilesh Rane is BJP's winner in all upcoming elections | आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच - निलेश राणे 

आगामी सर्व निवडणुकीत विजयी गुलाल भाजपचाच - निलेश राणे 

googlenewsNext

- संदीप बोडवे

मालवण : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. संधी प्रत्येकाला मिळते मात्र प्रमाणिक कामातून प्रत्येकाने यश मिळवले पाहिजे. आगामी २०२४ मध्ये लोकसभा आणि राज्यतातील सर्व निवडणुकीत भाजप जिंकेलच. मात्र तुम्हा युवकांचे त्या विजयात योगदान किती हे महत्वाचे आहे. त्यासाठी धेय्य वेडे होऊन काम करा, जनतेची सेवा करा, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केले. 

दरम्यान, आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीत गुलाल फटाके भाजपचेच असणार. सर्व निवडणुकीत १०० टक्के यश भाजपला मिळणार. वैभव नाईकला जनता घरी बसवणार, असे सांगून निलेश राणे यांनी मालवणात दरवर्षी भव्यदिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरवणार असे स्पष्ट केले. भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर युवक संवाद मेळावा मालवण शहर येथील दैवज्ञ भवन सभागृहात भव्यदिव्य पद्धतीने मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. 

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, युवमोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, उद्योजक दीपक परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, अभय कदम, भाई मांजरेकर, युवमोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकीत वराडकर, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत, फ्रँसिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निलेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळ्या उंचीवर नेले. आज नारायण राणे केंद्रीय राजकारणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखाली देशपातळीवर काम करत आहेत. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मतदारसंघात काम केले. त्याला तोड नाही. यापुढेही मालवण कुडाळसह जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधींचा विकासनिधी आणायचा आहे, असेही निलेश राणे म्हणाले. 

Web Title: Nilesh Rane is BJP's winner in all upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.