संकुलातील ९ गाळे चोवीस तासांत ताब्यात घेणार

By admin | Published: March 13, 2015 11:30 PM2015-03-13T23:30:58+5:302015-03-13T23:59:50+5:30

पालिका बैठकीत साळगावकरांचा इशारा : ३९ गाळेधारकांकडून नियमांचे उल्लंघन

The nine blocks in the package will be held in 24 hours | संकुलातील ९ गाळे चोवीस तासांत ताब्यात घेणार

संकुलातील ९ गाळे चोवीस तासांत ताब्यात घेणार

Next

सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ३९ गाळ््यांपैकी नऊ गाळेधारकांनी पूर्णत: नगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांचे गाळे पालिका २४ तासांच्या आत ताब्यात घेणार असून, उर्वरित गाळेही लवकरच खाली करणार, असा इशारा सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. तसेच ३९ गाळेधारकांपैकी १५ गाळेधारकांनी दिलेली लेखी उत्तरे समाधानकारक नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, अ‍ॅड. अरुण पणदूरकर, संजय पेडणेकर, गोविंद वाडकर, देवेंद्र टेमकर, अनारोजिन लोबो, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, अफरोझ राजगुरू, शुभांगी सुकी, साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांबाबतचा ठराव नगरसेवक संजय पेडणेकर यांनी वाचला. त्यावर अ‍ॅड. पणदूरकर यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, संकुलातील ३९ गाळेधारकांनी पालिका नियमाचे पूर्णत: उल्लंघन केले असून त्यातील ९ गाळेधारकांनी तर इमारतीचे स्ट्रक्चरच बदलून टाकले आहे. त्यामुळे या गाळ््यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच १९८३ च्या स्थावर मालमत्ता हस्तांतर कायद्यानुसार हे गाळे पालिका ताब्यात घेऊ शकते, असेही यावेळी अ‍ॅड. पणदूरकर म्हणाले.तर उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, गोविंद वाडकर, नगरसेविका अनारोजिन लोबो, शुभांगी सुकी, वैशाली पटेकर, अफरोझ राजगुरू यांनी या गाळेधारकांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात इमारतीला धोका उद्भवला तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे. आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही तसा ठराव घ्यावा, असे नगरसेवकांनी यावेळी सांगितले. तसेच प्रशासनाने दिलेला अहवाल चुकीचा असून ते नगरसेवकांच्या डोळ्यात धूळफेक करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.यावर नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सभागृहाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी केलेले कृत्य हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून या गाळेधारकांवर पालिका नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे, पण त्यातील ९ गाळेधारकांचे गाळे हे चोवीस तासात पालिका ताब्यात घेणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. आम्ही नागरिकांचे हित पहिल्यांदा जपणार असून, इमारतीला धोका उद्भवला तर त्याची भरपाई कोण देणार, असा सवाल करत या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात येणार आहे. या इमारतीच्या गाळ््याची दर चार महिन्यांनी पाहणी केली जाईल, असेही नगराध्यक्ष म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The nine blocks in the package will be held in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.