किनाºयावर निर्माल्य कलश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:07 AM2017-08-31T00:07:02+5:302017-08-31T00:07:02+5:30

Nirmalya Kalash on Kina | किनाºयावर निर्माल्य कलश

किनाºयावर निर्माल्य कलश

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : मालवण नगरपरिषद शतक महोत्सवानिमित्त लोकसहभाग असलेले अनेक उपक्रम राबवित आहे. पालिकेच्या या धोरणाचे शहरातील जनतेने स्वागत करणे आवश्यक आहे. मालवण पालिकेने गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनावेळी निर्माल्य तसेच अन्य कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील किनाºयावर ‘निर्माल्य कलश’ उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शून्य कचºयाची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पालिकेच्या जोडीला सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. लायन्स क्लबच्यावतीने चिवला बीचवर निर्माल्य कलश उपलब्ध करून गणेशभक्तांना निर्माल्य तसेच अन्य प्रकारचा कचरा टाकण्याचे आवाहन केले जात होते. तर हॉटेल अतिथी बांबूचे मालक सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांनीही हातगाडी उपलब्ध करून दिली होती.
मालवण पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांच्या संकल्पनेतून आणि स्वच्छता सल्लागार समितीचे सदस्य तसेच स्वच्छतादूत महेंद्र पराडकर यांच्या नियोजनातून शहरात नऊ ठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले. संजय वराडकर यांनीही निर्माल्य कलश ठेवण्यासाठी नियोजन केले होते. स्वच्छता समितीच्या सदस्यांनी निर्माल्य गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली.
शहरातील नऊ ठिकाणी पालिकेच्यावतीने निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले. यात दांडी मोरयाचा धोंडा (दत्तात्रय नेरकर), दांडी किनारा (महेंद्र पराडकर, नारायण धुरी, नूतन रोगे), दांडी आवार (निखील गावकर, बाबला पिंटो), बंदरजेटी (मुकेश बावकर), मेढा (नरेश हुले), राजकोट (महेश काळसेकर), चिवला बीच (प्रसन्नकुमार मयेकर, शैलजा पाटील, मनोज धुरी), देऊळवाडा पूल (आप्पा मराळ), रेवतळे (नागरिक), आडारी (किशोर जैतापकर) या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Nirmalya Kalash on Kina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.