नितेश राणेंनी जनतेच्या मनातील 'दहा प्रश्नांची' उत्तरे द्यावी!, सुशांत नाईक यांचे आव्हान

By सुधीर राणे | Published: October 5, 2023 04:02 PM2023-10-05T16:02:24+5:302023-10-05T16:03:15+5:30

आमदार नितेश राणे रोज पत्रकार परिषद घेतात. त्यांनी दररोज एका प्रश्नाचे उत्तर जनतेला द्यावे

Nitesh Rane should answer the ten questions in the minds of the people, Sushant Naik challenge | नितेश राणेंनी जनतेच्या मनातील 'दहा प्रश्नांची' उत्तरे द्यावी!, सुशांत नाईक यांचे आव्हान

नितेश राणेंनी जनतेच्या मनातील 'दहा प्रश्नांची' उत्तरे द्यावी!, सुशांत नाईक यांचे आव्हान

googlenewsNext

कणकवली: पडवे येथे आपले वैद्यकीय महाविद्यालय उभारले, पण कणकवलीतील शासकीय रुग्णालय अद्ययावत कधी होणार? तसेच आमदार म्हणून गेल्या ९ वर्षात कणकवली मतदार संघात कोणती विकास कामे केली? ते आमदार नितेश राणे यांनी सांगावे. जनतेच्या मनातील दहा प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले आहे. 

कणकवली येथील विजय भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजू राठोड, मुकेश सावंत, अमेय जठार, उमेश मेस्त्री, तेजस राणे, सिध्देश राणे, बंटी उरणकर, संदेश सुतार, सागर गोरुले, मयूर दळवी, नंदू परब आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुशांत नाईक म्हणाले, आमदार नितेश राणे रोज पत्रकार परिषद घेतात. आता त्यांनी आम्ही विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे द्यावीत. दररोज एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. त्यांनी आपल्या कुटुंबाचे फायद्याचे असलेले पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण केले. परंतु कणकवली मतदारसंघातील अविकसीत शासकिय रुग्णालयामधून रुग्णांना चांगली सेवा कधी मिळणार? कुडाळ, मालवण सारखा कणकवली विधानसभा मतदारसंघातील  एसटी बसस्थानकांचा विकास का झाला नाही ? 

आपण जाहीर केलेल्या कणकवली येथील ए.जी.डॉटर्स कचरा प्रक्रीया प्रकल्पाचे काय झाले? देशाचे उद्योगमंत्री असलेल्या त्यांच्या वडिलांनी कणकवली मतदारसंघातील जनतेसाठी किती उद्योग आणले ? किती लोकांना रोजगार दिला? गेली ९ वर्ष आमदार असूनही देवगड शहराचा पाणी प्रश्न का सुटला नाही? २५ वर्ष त्यांचे वडील व ते सत्तेत असताना त्यांच्या गावातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न का सुटू शकला नाही ?

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या गगनबावडा व फोंडाघाट रस्त्यांचा प्रश्न ते अद्याप का सोडवू शकले नाहीत? प्रक्षोभक वक्तव्ये करुन सामाजिक एकोपा बिघडवण्याचे त्यांचे प्रयत्न का असतात ? औषध आपल्या दारी, मोफत वायफाय, रिव्हर राफ्टींग, सिंधुदुर्ग गाईड अशा जाहीर केलेल्या योजना आता चालू का नाहीत? त्यांचे वडील मराठा मंडळ कणकवलीचे १७ वर्ष अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रभर आपण स्वतः मराठा समाजाचे नेते म्हणून फिरता. मग कणकवली मराठा मंडळाचे काम अजून अपूर्ण का? या प्रश्नांची उत्तरे नितेश राणे यांनी द्यावीत. 

Web Title: Nitesh Rane should answer the ten questions in the minds of the people, Sushant Naik challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.