कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणार - नीतेश राणे

By admin | Published: February 13, 2017 09:30 PM2017-02-13T21:30:30+5:302017-02-13T21:30:30+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांचा 'थंड भ्रष्टाचार' आम्हाला पहायला

Nitesh Rane will demand a copy of the copy table book | कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणार - नीतेश राणे

कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणार - नीतेश राणे

Next

ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 13 - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांचा 'थंड भ्रष्टाचार' आम्हाला पहायला मिळाला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच या कॉपी टेबल बुकची निविदा नारायण राणे पालकमंत्री असताना काढण्यात आलेली होती. असे जर केसरकर म्हणत असतील तर मग या निविदेच्या दरात साडे सात लाखांची वाढ का करण्यात आली. त्याला मंजूरी कोणी दिली? याबाबत त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगरसेवक समीर नलावडे, अण्णा कोदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, नारायण राणे पालकमंत्री असताना निविदा काढली म्हणजे भ्रष्टाचार झाला का? असे होत नाही. तसे जर असेल तर केसरकर आता पालकमंत्री आहेत . त्यांच्या काळात अनेक कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. त्या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असे आम्ही म्हणायचे का? असा प्रश्न आमदार राणे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, या कॉपी टेबल बुकची संकल्पना नारायण राणे यांची होती. त्या पुस्तकात त्यांचा फोटो किंवा अभिप्राय तरी घेतलेला आहे का? एवढ्या 'मॅनर्स' तरी पाळायला नकोत का? नारायण राणे यांना ते पुस्तक पाठविण्याचा प्रयत्न झाला का? तसेही नाही. या माध्यमातून घाणेरडे राजकारण केले गेले आहे.
या पुस्तकाची मूळ निविदा 25 लाखांची होती. केसरकर पालकमंत्री झाल्यावर त्यात साडे सात लाख रुपयांची वाढ करण्यात आली. असे का झाले? याचा त्यानी खुलासा करावा.
या पुस्तकाच्या छपाई नंतर प्रत्येकी 1800 रूपये असे 84 लाख 60 हजार रूपये इतकी रक्कम शासनाकड़े जमा व्हायला हवी होती. त्यापैकी किती जमा झाली ? 262 पुस्तके दीपक केसरकर यांनी वाटली आहेत. त्याची सुमारे 5 लाख रूपये किंमत होते. ती त्यानी जमा केली का? पुस्तके छापली किती? वाटली किती? ज्यांच्या नावे ती पाठविली त्यांना मिळाली का? याबाबत प्रशासनाकडे काहीच माहिती उपलब्ध नाही.सर्वच गौड़ बंगाल आहे.
हे पुस्तक नाशिक, पुणे येथे छापता आले असते. मात्र, त्याची छपाई हैद्राबादला का करण्यात आली? याची उत्तरे त्यानी द्यावीत. जिल्हाधिकाऱ्यानी पारदर्शक कारभार दाखवायचा असेल तर कोणाच्या दबावाला बळी न पड़ता या प्रकरणाची चौकशी करावी. लाच लुचपत प्रतीबंधक विभागाकडे आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.
पारदर्शक कारभाराची शासन राज्यभर बोंबाबोंब करीत आहे. तर या प्रकरणाचे खुलासे पालकमंत्र्यानी करावे.असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)
पक्षप्रमुखांबाबत हाच आदर का?

शिवसेनेच्या मंत्र्यानी राजीनामे देण्याबाबत विचार करावा. जरा संयमाने घ्यावे असे केसरकर सांगतात. त्यांचे पक्ष प्रमुख आपला स्वाभिमान जपत मंत्र्याना राजीनामे द्यायला सांगतात. असे असताना पक्ष प्रमुखांच्या स्वाभिमाना बद्दल केसरकराना काय किंमत आहे. ते या वक्तव्यातून दिसून येते. भाजपला पोषक अशी भूमिका ते घेत असून मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहेत.हे यातून सिध्द होते. त्यामुळे जुन्या शिवसैनिकानी याचा विचार करावा. अन्यथा 2019 मधील विधानसभा निवडणूकित सिंधुदुर्गात दीपकसेना विरुध्द शिवसेना असा सामना त्यांना बघायला मिळेल.असे आमदार राणे यावेळी म्हणाले.
हक्कभंग आणण्याची वेळ आणू नका!
शरद पौंक्षे यांच्या नाटकासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला. त्याला किती खर्च आला? तो दिला गेला का? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चार आठवडे उलटूूनही माहिती दिली नाही. आमदारानी मागितलेली माहिती 30 दिवसाच्या आत न दिल्यास संबधित अधिकाऱ्यावर हककभंग आणता येतो. तशी वेळ आणू नका.असा इशारा आमदार राणे यांनी यावेळी दिला.
खासदारांनी उत्तर द्यावे!
शिवसेना भवनवर पक्ष प्रमुखांकडे सिंधुदुर्गातील 150 जागांवरील उमेदवारांची यादी शिवसेनेने पाठविली आहे. मात्र, येथे तेवढे उमेदवार उभे न करता भाजप बरोबर छुपी युती केली आहे. हा पक्ष प्रमुखांचा अवमान नव्हे का? याबाबत खासदार विनायक राऊत यांनी उत्तर द्यावे. आमची डोकी भ्रष्ट झाली आहेत.असे ते म्हणतात मग खंबाटा मधील भ्रष्टाचार कोणी केला आहे? या कंपनीत कोकणातीलच जास्त माणसे आहेत. मराठी माणसासाठी शिवसेना या घोषवाक्याला आता काय अर्थ राहिला आहे. हे त्यानी सांगावे.

Web Title: Nitesh Rane will demand a copy of the copy table book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.