नीतेश राणेंकडून आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना, कंत्राटदाराची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 05:22 PM2021-04-21T17:22:35+5:302021-04-21T17:27:58+5:30

Devagad CoronaVirus NiteshRane Sindhudurg : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामध्ये तालुक्यात ६५ टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याची खंत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी आढावा बैठकीत मांडली.आमदार नितेश राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून रिक्त पदे भरणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना केली.

Nitesh Rane's instructions to health officials in the review meeting | नीतेश राणेंकडून आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना, कंत्राटदाराची कानउघडणी

देवगड तहसिल कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या नियोजन बैठकिमध्ये आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उसंबंधित विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. (छायाःवैभव केळकर)

Next
ठळक मुद्देनीतेश राणेंकडून आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना, कंत्राटदाराची कानउघडणीरिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण:संतोष कोंडके, आढावा बैठकीत माहिती

देवगड : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामध्ये तालुक्यात ६५ टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याची खंत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी आढावा बैठकीत मांडली.आमदार नितेश राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून रिक्त पदे भरणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी सूचना केली.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक देवगड तहसिल कार्यालयात झाली.

यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सभापती रवी पाळेकर, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, निवासी नायब तहसिलदार सत्यवान गवस, स.पो.निरिक्षक संजय कातिवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मेहूल जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे यांनी तालुक्यातील कोवीड रूग्ण स्थितीबाबत आढावा घेतला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी तालुक्यात सध्या २९८ सक्रीय रूग्ण असल्याची माहिती दिली. कायम संपर्कात असलेल्या पत्रकार, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, रिक्षाव्यवसायिक यांना लस देताना प्राधान्यक्रम द्या, तालुक्यासाठी दोन व्हेंटीलटर व एक एम्डी मेडीसीन अधिकारी यांची जिल्हा रूग्णालय यांच्याकडे मागणी करा अशा सूचना यावेळी आमदार राणे यांनी केल्या. देवगड कोवीड सेंटरसाठी देवगड हायस्कूलच्या इमारतीची पाहणी आमदार राणे यांनी केली.

कंत्राटदाराची कानउघडणी

कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना निकृष्ट आहार दिला जात असल्याचा तक्रारी रूग्ण करीत आहे, असे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी सांगीतले. यावेळी आमदार राणे यांनी ही गंभीर बाब असून याबाबत तत्काळ संबंधित कंत्राटदार याच्याशी संपर्क साधून त्याची कानउघाडणी केली. रूग्णांना चांगला आहार द्या अन्यथा ठेका रद्द करावा लागेल असा इशारा दिला.

 

Web Title: Nitesh Rane's instructions to health officials in the review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.