निजामुद्दीन-थिरुवनंतपुरम गाडीला सिंधुदुर्गात थांबा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:31 PM2021-03-22T17:31:05+5:302021-03-22T17:32:00+5:30
railway Sindhudurg-कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन- थिरुवनंतपुरम -हजरत निजामुद्दीन अशी एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी सोडण्यात येणार आहे.
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन- थिरुवनंतपुरम -हजरत निजामुद्दीन अशी एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी सोडण्यात येणार आहे.
या गाडीला दक्षिण कोकणात फक्त रत्नागिरी स्थानकात थांबा आहे. हजरत निजामुद्दीन थिरुवनंतपुरम (०४०३४) ही गाडी शुक्रवार २६ मार्चला सकाळी ५ वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ४.५५ वाजता थिरुवनंतपूरम येथे पोहोचेल.
थिरुवनंतपूरम-हजरत निजामुद्दीन (०४०३३) ही गाडी बुधवार ३१ मार्चला दुपारी १२.३० वाजता थिरुवनंतपूरम येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी रात्री १०.४० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. गाडीला सुरत, वापी, वसई, पनवेल, रत्नागिरी, करमळी, मडगांव , कारवार, उडपी, मेंगलोर, कन्नूर, थ्रिस्सूर, एर्नाकुलम, कोल्लम आदी स्थानकांवर थांबा आहे.