ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:48 PM2021-03-31T16:48:08+5:302021-03-31T16:50:10+5:30

corona virus Market sindhudurg -संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.

No masks, no social distance: a weekly market based on rules | ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार

ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार

Next
ठळक मुद्देना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग : नियम धाब्यावर बसवित आठवडा बाजार जयेंद्र परुळेकर यांचा सावंतवाडीच्या बाजाराला आक्षेप

सावंतवाडी : संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाच सावंतवाडीत मात्र आठवडा बाजार सुरू असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांंनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत कोरोनाची लागण सावंतवाडीत व्हावी, अशी इच्छा आहे का? असा सवाल केला. या आठवडा बाजारावर मात्र जिल्हा प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल आता होऊ लागला आहे.

संपूर्ण राज्यात सध्या वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण कमी व्हावेत म्हणून शासन स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कडक उपाययोजना आखण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. छोटे-मोठे कार्यक्रम कुठेही असले तर त्यावर बंदी घालण्यात येत आहे. लग्न समारंभासाठी परवानगी देत असताना नियम काटेकोरपणे पाळा असे प्रशासन सांगत आहे. हे सर्व सुरू असतना दुसरीकडे मात्र सावंतवाडी नगरपालिकेने जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसून येत आहे.

सावंतवाडीत कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. अशातच नगरपालिकेने कुठे तरी पुढाकार घेऊन आठवडा बाजार बंद करणे गरजेचे असताना मंगळवारचा आठवडा बाजार सुुरूच ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एरव्ही छोट्या-छोट्या टपऱ्यावर धाड घालणारे मुख्याधिकारी राज्य शासनाने आखून दिलेले नियम कसे काय मोडतात, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

विरोधी नगरसेवक जयेंद्र परुळेकर यांनीही नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवले असून, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठिकाणी रुग्ण मृत्युमुखी पडत असताना सावंतवाडी नगरपालिकेला बाजारातून एवढे किती उत्पादन मिळते की अन्य काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच मुख्याधिकारी हे वेळोवेळी मटक्यावर धाडी टाकतात. मग तेव्हा आपत्कालीन व आता हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात तेव्हा काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्याधिकारी यांची कृती चुकीची असल्याचे सांगितले. तसेच या विरोधात आपण जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: No masks, no social distance: a weekly market based on rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.