माझे मंत्री पद कुणीही अडवू शकत नाही, मी मंत्री होणारच - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 05:33 PM2017-11-18T17:33:59+5:302017-11-18T17:38:06+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
दीपक केसरकरांवर नारायण राणेंचा घणाघात
दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला कंलक आहे. हा कंलक आगामी विधानसभा निवडणुकीत पुसणार, असे यावेळी नारायण राणे यांनी म्हटले.
मला मंत्री न करण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा
नारायण राणेंना मंत्री करू नका यासाठी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. केसरकर हा चिरपूट आणि खोटारडा आहे. जिल्ह्यात वैद्यकीय व्यवस्था नाही, निधीची घोषणा मात्र प्रत्यक्षात किती निधी आणला ते सांगावे. केसरकरांचे काम दाखवा आणि एक लाख कमवा, अशी घोषणाही यावेळी नारायण राणे यांनी केली.
नारायण राणेंना महाराष्ट्रात उचलून घेतात पण जिल्ह्यात काही जण विरोध करतात. माझ्या मालमत्तेबाबत क्राईम ब्रॅचने चौकशी करून क्लिन चिट दिली. केसरकर यांच्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे. मग त्यांनी चौकशी करावी केसरकर यांच्या सांगण्यावरून खोट्या बातम्या दिल्या तर पत्रकांराना न्यायालयात खेचणार, त्यांच्या कडून आरोपाबाबत पुरावे घ्या, असेही यावेळी नारायण राणे म्हणालेत.